विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

सीताबर्डी किल्लाचा इतिहास भाग ५

 








सीताबर्डी किल्लाचा इतिहास
भाग ५
लेखन ::सतीश राजगुरे
'सीताबर्डी' नाव कसे पडले?
सीता बर्डी परिसरात 200 वर्षांपूर्वी धनगर आणि गवळी राहत असत. ते लोक दूध विकण्याचा धंदा करत. त्याकाळी वस्तीत शितला प्रसाद आणि बद्री प्रसाद या दोन बंधूंचा प्रभाव होता. ते स्वतःला पुढारी समजत. त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्या दोन बंधूंच्या नावावरून सीताबर्डी या नावाची उत्पत्ती झाली असावी, असे म्हणतात. शितलाचे सीता आणि बद्रीचे बर्डी अशी उत्पत्ती सांगितली जाते. बर्डी हे नाव ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या उच्चारण पद्धतीमुळे निर्माण झाले असावे. हे दोघे बंधू दूध देण्यास रेसिडेन्सीत जात, त्यावेळी जेकींन्स हा रेसिडेंट होता. तो दोघांचा उल्लेख शितला प्रसादचा सीता तर बद्री प्रसादचा उल्लेख बद्री करायचा. यावरून सीता-बद्री-सीता-बर्डी हे नाव प्रचलित झाले असावे.
तळटीपा

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...