







आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभिक काळामध्ये राजाराम महाराजांनी प्रचंड लष्करी डावपेच क संयोजनाच नमुना दाखवत महाराष्ट्र व दक्षिणेत कर्नाटक अश्या 2 फळ्या मोगलांच्या विरुद्धात उभ्या केल्या त्यामुळे बादशहाला त्याची ताकत व लक्ष दोन्ही विचलित करून दक्षिणेत पसरावी लागली व अपोपप महाराष्ट्रावरील आक्रमणाचा जोर कमी झाला.





राजाराम महाराजांच्या कालखंडात मराठे प्रबळ असणारे गडकोट आपल्या ताब्यात ठेवत व त्या परिसरातील ठाणी मोगलांच्या ताब्यात असत . फोजेची टाकत ही ठाणी ताब्यात घेण्यासाठी न वापरता मोगल मुलुखात धुमाकूळ घालून पैसा उभारण्याचा काम करत असत.





" हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठे लोकांचे आहे. आवघे मिलोन कस्त करिता तेव्हा गणिमाचा काये हिसाब आहे"
यातून राष्ट्रीय ऐक्याची भावना देत हे रयतेचे राज्य आहे व ते आपण सर्वांनी एकतर येवून लढा दिला तर टिकवणे सहज शक्य आहे याची जाणीव ते करुन देतात.
तसेच बाजी सर्जेराव जेधे याना पाठीवलेल्या पत्रात लिहितात
" गनिमाचा हिसाब काय आहे ! तुम्ही लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय? गनिमास तुम्ही लोकी केला आहे. ते तुम्हीच लोक या राज्याची पोटतिडकी धरता तेव्हा (आम्ही) अवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही."
यातून ते वतनाच्या लोभामुळ जेव्हा आपलेच लोक गनिमाला जाऊन मिळतात त्यामुळे गनिमाचे ताकत वाढून तो बलवान होतो अशावेळी जर स्वराज रक्षणासाठी जर सर्वजण एक आले तर शत्रूला परास्त करन हे सहज शक्य आहे .





"तुम्ही पुरंदरची हवी(हेरगिरी) करून गाद हस्तगत करून देणे. कोन्हेविशी शक न धरणे . स्वामी तुमचे चालवतील आपले दिलासे असो देऊन एकानिस्टने स्वामीकार्य करणे ." ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वाना एकत्र करुन स्वराज्य स्थापन केले त्यापरामाणेच सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या मध्ये रहाणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रभवना जागृत करून देत सर्व घटकांना एकत्र करून त्याना अश्वाशीत करून एक मोठा लढा उभा करत होते.





छत्रपती राजाराम महाराजांनी सरंजाम पद्धतीला पुन्हा सुरवात केली पण त्यांनी सरंजाम देताना स्वराज्यमध्ये न देतात शत्रूच्या प्रदेशात दिला त्यामुळे शत्रूचा प्रदेश काबीज करण्याची जणू सरदारान मध्ये स्पर्धा सुरू झाली .यामध्ये सेनापती संताजी घोरपडे सेनापती धनाजी जाधव , हिमतबहादूर विठोजी चव्हाण, हबीराव मोहिते .अश्या अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली व स्वराज्य रक्षण करत करत स्वराज्याचा विस्तार सुध्दा केला . या कठीण प्रसंगांमध्ये जेव्हा जिंजीला वेढा पडला होता तेव्हा तंजावरच्या शहाजी महाराज यांनी राजाराम महाराजांना वेळोवेळी मोलाची मदत केली . 







आशा या पराक्रमी मुत्सद्दी शिवपुत्रास जयंती दिनी विनम्र अभिवादन 









मा. श्री. रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष)
मा. श्री. संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
No comments:
Post a Comment