विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 January 2025

सरदार सिदोजीराजे निंबाळकर



 सरदार सिदोजीराजे निंबाळकर यांचा घुमट

वडगाव निंबाळकर तालुका बारामती
सदर समाधीछत्री/ घुमट निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर आहे. दोन्ही बाजूला एक शिलालेख कोरला आहे
घुमटाचा आकार भव्य असून चारी बाजूला नक्षीकाम व गाभ्यारात शिवपिंड आहे. सदर शिलालेख देवनागरीत लिपीत आहे.
शालिवाहन शके १६१५ श्री मुखनाम संवत्सरात मौजे वडगाव निंबाळकर गावातील मुकादम पाटील विठोजीराजे निंबाळकर व इतर जणांनी मिळून सिदोजीराजे निंबाळकर यांचा घुमट 18 नोव्हेंबर 1693 मध्ये बांधून पूर्ण केला.बांधकामास 3809 रुपये लागले. घुमटाच्या देखरेखीसाठी आलमपना याने चार चावर जमीन इनामी करून दिली. छत्रपती राजाराम महाराजांनी पण या घुमटा साठी देखरेख करता चार चावर जमीन दिली.
हे कार्य पुढे न चालवल्यास त्यास गोहत्त्याचा व ब्राह्मण हत्येचा पातक लागेल असे शिलालेखाच्या शेवटी म्हटले आहे .
राजे निंबाळकर घराण्यातील या घुमटावरील शिलालेख महत्त्वाचा असून आपल्या घराण्यातील पुरुषांबरोबर स्त्रियांची यांची नावे देऊन हे स्मारक बांधले आहे..
शिलालेखाचे वाचन श्री Anil Dudhane यांनी केले असून तो प्रकाशित केले आहे.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड पुणे

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...