रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ऐ
तिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हर्णे बंदर. ह्याच हर्णे गावाजवळ सागरी किल्ला “सुवर्णदुर्ग”...
सुवर्णदुर्ग किल्ला व्ही आकाराच्या खडकावर वसला आहे या किल्ल्याचा आडोसा हा बंदरातील बोटींना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित निवारा देण्याचे ठिकाण आहे. हर्णे बंदरासाठी प्रस्तावित असलेली जेटी सुवर्णदुर्ग ते भुईकोट किल्ला अशी बांधणे आवश्यक असल्याचे मत येथील जाणकार व्यक्त करतात हर्णे बंदरात पूर्वी साध्या होड्यांनी मस्त्य व्यवसाय चालत असे...
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा आरमाराचा दरारा कायम होता. संभाजीराजें सातत्याने युद्धात गुंतले असताना सुद्धा सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज या सागरी प्रबळ सत्तांना मराठ्यांचे जलदुर्ग जिंकून घेता आले नाहीत. उलट संभाजीराजेंनी सिद्दीच्या उंदेरीवर दोन वेळा हल्ला केला. जंजिऱ्याच्या खाडीत सेतू बांधण्याचा प्रयत्न करत संभाजी महाराजांनी सिद्दीला अक्षरशः जेर करून टाकले. अंजदिव बेटावर, कल्याणच्या खाडीच्या मुखाशी पारसिक डोंगरावर, चौलजवळ किल्ले बांधण्याचा प्रयत्न करून त्यांनी पोर्तुगीजांना हवालदिल करून सोडले. इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी संभाजी महाराजांनी एलिफंटा जवळील बेटावर सुद्धा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला...
● किल्ले सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे यांचा उदय :
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सुवर्णदुर्ग वर अचलोजी मोहिते नावाचे किल्लेदार होते. इसवी सन १६८८ मध्ये भर समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यास सिद्दीने वेढा घातला. सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार व जमिनीच्या बाजूने सैन्याची भलीमोठी फळी उभारून सिद्दीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली. सिद्दीने राजकारण करून सुवर्णदुर्गच्या किल्लेदारालाच आपल्या बाजूने वळवून घेतले. किल्लेदार फितुर होऊन सुवर्णदुर्ग सिद्दीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यातील कान्होजी आंग्रे नावाच्या तरूणाला मान्य नव्हती. त्याने रातोरात सुवर्णदुर्गावरील आपल्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदारालाच कैद करून गडाचा ताबा आपल्याकडे घेतला...
यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्दीवर हल्ला चढवला. दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी आंग्रे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सिद्दीच्या कैदेत सापडले. परंतु कान्होजींनी सिद्दीच्या कैदेतून शिताफीने आपली सुटका करून परत मराठ्यांच्या या चिवट लढ्यामुळे अखेर सिद्दीला माघार घेऊन वेढा उठवावा लागला. सुवर्णदुर्ग गाठला. गडावर येताच कान्होजी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवत राहिले कान्होजींच्या या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली. पुढे हेच कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे सरखेल बनले...

No comments:
Post a Comment