विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

सरसेनापती संताजी घोरपडे यांनी २०००० सैन्यानिशी खानास गाठले

 


सरसेनापती संताजी घोरपडे यांनी २०००० सैन्यानिशी खानास गाठले

भिमसेन सक्सेना हा रावदलपताचा चिटनिस व मोगल ईतिहासकार त्यावेळी या लढाईत सामील होता त्याने हा प्रसंग सविस्तर लिहून ठेवला आहे तो म्हणतो - जुल्फीकारखान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरवात केली. मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. त्यानी मोगलांची वाट अडवली. मोगलांकडे बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपताने सैन्याची उजवी बाजू संभाळली आणि त्याने शत्रूंना हटवले. ईतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसर्या दिवशी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यानी निकराचे हल्ले चढविले. त्यानी ईतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यासोबत असलेले वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांच्या बंदुका मोगल सरदाराच्या हत्तीवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फीकारखान व राव दलपत यांच्या हत्तीना अनेक गोळ्या लागल्या. राव दलपताने स्वत: गोळ्या झाडून आनखी काही मराठा सरदारांना ठार मारले. मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता. आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेते लागली. आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले.
संताजी घोरपडे यांनी देसुर येथे मोगलांची प्रचंड सामग्री लुटुन नेली.
ही देसुरची लढाई झाली ती तारीख होती -
५ जानेवारी १६९३
संताजी घोरपडे जफतनमुलूख
लेखक - रवि पार्वती शिवाजी मोरे
@sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...