#खूबलढा_मरहाट्टे....
वारंवार कुरापती काढणाऱ्या हैदरचा पुरा बंदोबस्त करावा म्हणून मराठा फौज कर्नाटकात उतरली धुळपांचे मराठा आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठा फौजेपुढे कमी होते समोर समोर हैदर लढाई करतच नव्हता...
मराठ्यांचा गनिमी कावा जणू त्याने अंगीकारला होता बंकापुर, सावनुर येथेही चकमकी झाल्या शेवटी सारी मराठा फौज धारवाडच्या किल्ल्या समोर आली दोन महिने नेटाने वेढा चालवून अखेर मराठ्यांनी शेवटी धारवाडच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ध्वज फडकला हैदरच्या सैन्याला धर्मवाट देण्यात आली...
धारवाड घेतल्यावर मराठा फौज हनगळास आली. १ डिसेंबर १७६४ रोजी हैदरच्या अनवडी येथील छावणीवर मराठ्यांनी हल्ला चढवला तुफान कापाकापी झाली मराठ्यांनी बेजरब घोडी चालवून झाडीत शिरून गारद्यांचे बुरुज फोडून हजार बाराशे कापून काढले. पाच सातशे धरून आणले. चहूकडून सारे उठले पाच सातशे तोफा होत्या त्याही आणल्या थोडेसे मैदान असते तर खास हैदर धरला असता. झाडीने त्याला वाचवले आमचे फौजेत २५ ते ४० माणूस व ७५ घोडे पडले असेल मुरारराव घोरपडे यांनी मोठी मर्दुमकी केली...
● मुरारराव घोरपडे म्हणजे कर्नाटकातील मराठेशाहीचा मूर्तिमंत इतिहास होय...!
मुराररावांच्या शंभर घोडेस्वारांचा एकही अधिकारी असा नव्हता की जो सर्व लष्कराचे सेनापतीपद करू शकत नसे. पण एवढे मोठे कर्तृत्व अंगी असूनही आपल्याला जे स्थान मिळाले आहे ते समाधानी मनाने आणि निष्ठेने सांभाळण्यात तो आपले कर्तव्य मानीत असे. त्यांचे अधिकारी एकमेकांशी अत्यंत आपलेपणाने वागत असत. आणि आपल्या प्रमुखाची आज्ञा पालन करण्यात ते यत्किंचितही कसूर करीत नसत. अशा विविध गुणांमुळे मुराररावांचे सैन्य भारतात त्या काळी असलेल्या इतर कोणत्याही देशी सैन्यापेक्षा निरपवाद उत्कृष्ट होते. मराठा माणसात जे 'गुण असतात ते सर्व गुण तर मुराररावांच्या सैनिकात होतेच, उदाहरणार्थं चपलता, शिस्त, घोड्यांची निगा राखण्यात आणि त्यांचा उत्तम उपयोग करण्यात आपुलकी, इत्यादी. पण या सर्व गुणांशिवाय मुराररावांच्या सैन्यात आणखी काही गुण होते. युरोपियनांशी लढण्याचे प्रसंग आल्यामुळे मुराररावांच्या सैन्याने बंदूका व तोफा चालवण्याचे अद्वितीय कसब आत्मसात केले होते..”
राजकारणात वेळप्रसंगी बाजू बदलाव्या लागतात. तात्पुरते डावपेच म्हणूनही असा बदल केला जातो. मोठ्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी काही वेळा असे धोरण स्वीकारण्यात राजकीय डावपेचांच्या संदर्भात गैर मानले जात नाही. मुराररावांनीही दक्षिण भारताच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्या धोरणात बदल केलेला आहे शत्रू- मित्रांच्या बाबतीत प्रसंगानुसार भूमिकाही बदलली आहे. पण असे करीत असताना त्यांनी अतिशय सावधगिरी घेतली आहे. हैदराएवढा विश्वासघातकी दुसरा शत्रू नाही अशी त्यांची पक्की धारणा होती. मराठ्यांच्या हितसंबंधांना दक्षिणेत धक्का पोहोचू नये अशीही मुराररावांची दृष्टी होती...
या अनवडी लढाईत हैदरअलीचा मोठा पराभव झाला तो जीव वाचवून कसाबसा पळून गेला...

No comments:
Post a Comment