विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2019

निळो मोरेश्वर


निळो मोरेश्वर-
हा मोरोपंत पिंगळे पेशवे यांचा पुत्र.शिवरायांच्या पश्चात राजारामास गादीवर बसविण्याच्या कटांत हा सामील असावा अशा समजुतीने छत्रपती संभाजीनें यास कैदेंत ठेविलें होतें. पुढें मोरोपंत वारल्यावर याला कैदेतून काढून छत्रपती संभाजीनें पेशवेपद दिलें (१६८०). नंतर कर्नाटकांतील प्रदेश संभाळण्याच्या कामीं हरजी राजे महाडीक यांच्या मदतीस यास पाठविण्यांत आलें (१६८१). त्या दोघांनीं तिकडे औरंगझेबाच्या हातून आपला गेलेला प्रांत अनेक संकटें सोसून परत मिळविला. मध्यंतरी याचा चुलता केसोपंत यानें याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीचे कान फुंकले; त्यामुळे संभाजीची याच्यावर गैरमर्जी झाली होती; परंतु ती पुढें नाहींशी झाली. छत्रपती संभाजीच्या पश्चात राजारामास जिंजी येथें जे थोड्याशा विश्रांतीनें दिवस काढतां आले, त्यास कारण हरजी व निळोपंत यांचीच तिकडील कामगिरी होय. त्यामुळें राजारामानंहि त्याच्याचकडे पेशवेपद कायम केलें(१६९०). जिंजीस असतांना मोंगलांचा प्रसिद्ध सरदार इस्माईलखान मका हा आपल्या पथकासह याच्यातर्फे राजारामाच्या पदरी होता. शाहूनें सातारा घेतला तरी हा त्याला न मिळतां ताराबाईकडेच राहिला, त्यामुळें शाहूनें त्याच्या भैरव नांवांच्या धाकट्या भावांस पेशवेपद दिलें. थोड्याच दिवसांत निळोपंत हा रांगण्यास मरण पावला(१७०८). [राजाराम व संभाजी यांच्या बखरी; जेधे शकावली.]

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...