विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 May 2019

हंरिपंत फडके- भाग 2


हंरिपंत फडके-
भाग 2
राघोबा व इंग्रज यांचीं सैन्ये गुजराथेंत असतांना त्यांच्या लोकांच्या व हरिपंताच्या लहान लहान चकमकीं होतच होत्या (एप्रिल व मे १७७५) ता. १८ मे सन १७७५ रोजीं कर्नल कीटिंग राघोबासह पुण्यावर चालून येत असतां त्यांच्यां सैन्याशीं हरिपंतांनी आराम येथें लढाई दिली. इंग्रजांच्या तोफखान्याच्या माऱ्यामुळें अखेर जरी मराठयांचा पराभव झाला तरी या लढाईत इंग्रजाचें बरेंच नुकसान झालें. यानंतर नर्मदातीरी भाऊपीर येथें इंग्रजांच्या व याच्या सैन्याची गांठ पडण्याचा पुन्हां मोका आला होता. परंतु यानें आपल्या तोफा नदींत टाकल्या व अवजड सामान नदीपार करून नर्मदेच्या उतरतीरानें पूर्वेकडे हा घाईघाईनें निघून गेला (११ जून १७७५).इ. सन. १७७७ च्या पावसाळ्यानंतर हरीपंत फडक्याची हैदरअली वर पुणें दरबाराकडून रवानगी झाली. तो कर्नाटकांत आल्यावर त्याच्या सैन्यांतील मानाजी फकडे नांवाच्या सरदारास बाजीपंत बर्वे यानें हैदराकडे वळवून घेतलें. दुसरें दिवशीं कित्येक मानकरीहि त्याच्या मागोमाग हैदराकडे जाणार होते. परंतु यानें प्रथम मोठ्या शिताफीनें आपलें सैन्य मागें घेतलें व नंतर यशवंतराव माने नांवाच्या फितूर झालेल्या सरदारास तोफेच्या तोंडी देऊन आपल्या सैन्यांतील फितुरी कारस्थानांस आळा घातला. इ. स. १७७८ च्या आरंभाला हैदरानें कोपळ घेतलें व एप्रिल महिन्यांत धारवाडास वेढा दिला. यावेळी हरिपंतास पुण्याला येण्याविषयी हुकूम झाला असल्यामुळें त्यानें महादजी शिंद्याच्या सैन्यास मिळण्याकरितां आपण मिरजला जात आहों असें दाखविलें; व जेव्हां हरीपंत आतां महादजी शिंद्यासुद्धां आपल्यावर चालून येणार अशी हैदरास भीति वाटून त्यानें याच्याशीं तहाचें बोलणें लावलें, तेव्हां यानें त्यापासून बरीच खंडणी उकळली.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...