विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 May 2019

हंरिपंत फडके- भाग १

हंरिपंत फडके-
भाग १

हरि बल्लाळ फडके हा बाळंभट नांवाच्या नानाफडणिसाच्या घरच्या एका भिक्षुकाचा मुलगा. नाना फडणीस लहान असतां घराच्या एका भिक्षुकाचा मुलगा. नाना फडणीस लहान असतां घरचा कारभार हरिपंतांचा भाऊ बापू बल्लाळ पहात असे. पानपतच्या लढाईंत बापू पडला. इ. स. १७६२ त थोरले माधवराव पेशवे यांनीं हरिपंताची आपल्या कारकुनीच्या जागीं योजना केली. या कामांत हा जात्या फार वाकबगार झाला. त्याच्यावर श्रीमंतांची बहाल मर्जी असून केळशी महालची देशमुखी त्याला वतन देण्यांत आली होती. नारायणरावाच्या वधानंतर हा बारभाईच्या कारस्थानांत येऊन सामील झाला (१७७४) राघोबा कर्नाटकांतून पुण्याकडे यावयास निघाला तेव्हां याची त्यावर योजना झालीं होती. यानें मोरोबा प्रभृति मंडलीचीं पत्रें पकडून सवाईमाधवरावास आपल्या ताब्यांत घेण्याचा त्यांचा कट उघडकीस आणला (१७७४).
राघोबाचा पाठलाग करण्यास नानाबापूंनीं याची नेमणूक केली होती. माहीतीरीं राघोबाची फौज छावणी देऊन राहिली असतां यानें तिजवर अचानक छापा घालून तिला उधळून लाविली (१७ फेब्रु. १७७५). यावेळीं हरीपंताबरोबर होळकर व शिंदे यांच्या फौजा होत्या. होळकर व शिंदे हरीपंतास सोडून माळव्यांत गेले.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...