खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग १
मित्रांनो आजची गोष्ट एका दगलबाज खुन्यावर आहे.
चला तर पाहू कोण होता हा दगलबाज खुनी.
महाराष्ट्रातील वेग-वेगळ्या गायकवाड घराण्यांचे स्वराज्याप्रती योगदान फार मोठे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी श्रीमंत सकवारबाई साहेब ह्या गायकवाड घराण्यातील होत्या.
अफझलखानाच्या वधाच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचे जे दहा अंगरक्षक होते त्यात कृष्णाजी गायकवाड यांचे नाव येते. महाराजांच्या अवतीभोवती विश्वासाने वावरणारे आणी स्वराज्याप्रती निष्ठावंत असे हे गायकवाड घराणे होते.
आज आपण गायकवाडांच्या घरातील अश्याच एका शूर विराची वीरश्री पाहणार आहोत. आणी त्यांचे नाव म्हणजे पिलाजी गायकवाड.
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार गुजराथमध्ये करण्याचे श्रेय गायकवाड घराण्याकडे जाते. याच घराण्याचा आद्यपुरुष म्हणून पिलाजी गायकवाड यांचा उल्लेख येतो.
या पिलाजी गायकवाड यांचा खून मुघल बादशहाचा गुजराथेतील ५४ वा सुभेदार, राजराजेश्वर, महाराजाधिराज अभयसिंह याने गुजराथेतील 'डाकोर' मुक्कामी करविला.
(हे डाकोर बडोद्यापासून 63 किलोमीटर दूर खेडा जिल्ह्यात येते.)
पिलाजी गायकवाड यांचा खून करणारा हा अभयसिंह मारवाडचा म्हणजे आजच्या जोधपूरचा राजा होता.
ह्या अभयसिंहाचे पूर्वज म्हणजे जोधपूरचे जसवंतसिंहाचे घराणे पहिल्यापासूनच मराठ्यांचे कट्टर वैरी घराणे होते.
शाहिस्तेखानाची बोट तोडल्यावर सिंहगडला वेढा घालण्याच्या तयारीत असतानाच जसवंतसिंहाला मराठ्यांनी केलेल्या हल्याने पाठ दाखवून पळून जावे लागले होते.
आग्ऱ्यास शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना 'शिवाजी राजाचा लवकर खून करा. कश्याला जिवंत ठेवलंय शिवाला..' अस बोलून औरंगजेबाचे कान भरून देणाराही हाच जसवंतसिंह होता.
ह्याच जसवंतसिंहाचा वंशज असलेला अभयसिंह ही मराठ्यांशी असेच तिखट वैर राखून होता.
जोधपूरच्या राठोड घराण्याने शिवाजी महाराजांपासून थेट पहिल्या शाहू महाराजांपर्यंत मराठ्यांशी अत्यंत कट्टर वैर ठेवले.
दुर्गादास राठोड हा एकमेव व्यक्ती अपवाद आहे. हा मराठ्यांची शक्ती ओळखून होता. ह्याच्याच सल्ल्याने औरंगजेब पुत्र अकबर जीव वाचवून छत्रपती संभाजी राजांकडे आला होता. पण दुर्गादास राठोड काही जोधपूरचा राजा नव्हता. तो जोधपूरचा राजा असलेल्या जसवंतसिंहाच्या असकरण राठोड नावाच्या मंत्र्याचा मुलगा होता.
दुर्गादास याचे मारवाड राज्यात मोठं वजन होत.
अभयसिंहाने पिलाजी गायकवाड यांच्या खुनाची घटना अत्यंत नियोजनपूर्वक, जाणूनबुजून, आणी विचारपूर्वक केली होती. त्यामुळे या घटनेचा तपशील आणी विश्लेषण करणे आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे.
कारण हा खून एका मराठा सरदाराचा नव्हे तर मराठ्यांच्या विश्वासाचा, राजपूत-मराठा संबंधांचा, तसेच हा खून राजपुतांच्या स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचाही होता.

No comments:
Post a Comment