विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.भाग 2

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 2

महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
राजा अभयसिंहाच्या ह्या कृत्यामुळे मराठा आणी राजपूत संबंधांना मोठा तडा गेला आणी पुढे जाऊन मराठ्यांनी ह्याचा सूड उगवीला.
केव्हडा तो भव्य दिव्य राजपुतांचा इतिहास.
पण उडदा माजी काळे गोरे हे सापडायचेच. दोष हा समस्त राजपुतांचा नाही. परंतु आपण दैवयोगाने ज्या जातीत जन्म घेतो त्या जातीला आपल्यामुळे कधी कलंक लागू नये ह्यासाठी प्रसंगी आपण जीवही अर्पण करायला मागेपुढे पाहत नाही.
जो तो आपल्या पराकाष्ठेने ‘आपल्यामुळे आपली जन्म जात बदनाम झाली नाही पाहिजे’ याची पदोपदी काळजी घेत असतो.
मात्र मारवाडचा म्हणजे आजच्या जोधपूरचा राजा अभयसिंह राठोड याला अपवाद होता.
पिलाजी झुंगोजी गायकवाड हे मौजे दावडी, परगणा चाकण येथील पाटील घराण्यात जन्मले होते.
( दावडी गाव खेड तालुक्यात येते. खेडपासून साधारण 15 किलोमीटरवर हे गाव आहे. )
आपले चुलते दमाजी गायकवाड यांचेबरोबर मुलुखगिरी करीत असताना स्वकर्तुत्वाने हे पुढे आले. थोरल्या दमाजी गायकवाडांना मुलगा नसल्याने त्यांनी पिलाजीला दत्तक घेतले.
सेनापती दाभाड्यांच्या सैन्यात मर्दुमकी आणी कर्तबगारी गाजवीत ही मंडळी पुढे आली. इसवीसन १७१९ नंतर पिलाजी गायकवाड यांनी गुजराथेत आपला जम बसवायला सुरवात केली. सुरतेजवळील सोनगड किल्ला, बडोदे, डभई इत्यादी ठिकाणी पिलाजीने बळकट मराठा ठाणी प्रस्थापित केली.
इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा सेनापती दाभाड्यांस देण्यांत आला व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामही त्यांच्याकडेच सोपविण्यात आले.
परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ सुरु केली. बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यांस मुळीच न रूचून या दोघांत कायमचें वैमनस्य आलें.
पुढें दोघांनीही ही गोष्ट पहिल्या छत्रपती शाहू महाराजांच्या कानांवर घालून त्यांची आज्ञा विचारली. पहिल्या शाहू महाराजांनी आज्ञा केली की, "बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव दाभाडे यांनी जिंकलेल्या गुजराथेंत बाजीरावाने ढवळाढवळ करूं नये." छत्रपती शाहू महाराजांच्या या निर्णयामुळे बाजीराव निरूत्तर झाला.
पण बाजीरावाच्या मनातून दाभाड्यांची सल काही गेली नाही आणि पुढे ह्या दोघांत वाद वाढतच गेले.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...