#फत्तेसिंह_भोसले
#छत्रपती_शाहू_महाराजांचे_मानसपुत्र
मोगलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर, औरंगाबाद नजीक शाहू महाराजांचे तैनाती सैन्य होते.तेव्हा,जवळ असणाऱ्या पारदगावच्या पाटलाने,सयाजी लोखंडे याने शाहू महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला..यामधे लोखंडे पाटलाचा मृत्यु झाला.त्याच्या बायकोने आपले मूल शाहू महाराजांच्या पायावर घातले.आपल्याला युद्धात मिळालेला विजय म्हणून शाहू महाराज यांनी त्या मुलाचे नाव ठेवले ‘फत्तेसिंह’..शाहू छत्रपतींचे मानसपुत्र..!!
फत्तेसिंह बाबांचे सर्व शिक्षण सातारला शाहू महाराजांच्या देखरेखीत झाले.राजवाडयामधे त्यांची स्वतंत्र व्यवस्था होती. विरुबाई यांनी फत्तेसिंहांचा पुत्रवत सांभाळ केला होता. विरुबाईंच्या मृत्यूनन्तर फत्तेसिंग भोसले यांनीच त्यांचे अंतिम संस्कार केले.
शाहू महाराज यांनी पुढे चालून फत्तेसिंह बाबांच्या भावाला पारदगाव इनाम दिले आणि बाबांना जुन्नरपासून सासवडपर्यंतची 720 गावांची सरपाटीलकी दिली.
फत्तेसिंह राजेंनी तलवार चालवून आपला पराक्रम दाखवला होता.हुजूरातीच्या सैन्याचे ते प्रमुख होते.भागानगरचा सुभा फत्तेसिंहांना द्यावा,या हेतूने शाहू महाराजांनी त्यांना चित्रदुर्ग मोहीमेचे अधिपत्य दिले होते.पिलाजीराव जाधव,थोरले बाजीराव यांची निजामावरील स्वारी,कर्नाटकातील चौथाई वसुली,रायगड स्वराज्यात आननारी कोकण स्वारी,रघुजी भोसले यांची प्रचंड यशस्वी झालेली दख्खन स्वारी या सर्वांमधे फत्तेसिंह बाबांचा सहभाग होता..प्रत्येक मोहीमेमधे त्यांनी पराक्रम केला..
4 जानेवारी 1721 मधे निजामाच्या भेटीवेळी शाहू महाराजांनी बाजीरावांसोबत फत्तेसिंह बाबांनाही धाडले होते.तसेच,इ.स. 1737 च्या चंदवड येथे झालेल्या लढाईत फत्तेसिंहांना विजय मिळाला होता..इ.स. 1726 मधे कलबुर्गा भागातून त्यांनी चौथाईही वसूल केली होती….
फत्तेसिंह बाबांच्या पराक्रमाचे वर्णन खुद्द शाहू महाराजांनी केले आहे.जंजिरा स्वारीवेळी रायगड स्वराज्यात आला.फत्तेसिंह राजेंनी पराक्रम गाजवला.याचे वर्णन करताना शाहू महाराज म्हणतात,
“रा.शिवाजी महाराज व रा.आबासाहेब व काकासाहेब कोणास न जाहले ते कार्य चि. फत्तेसिंह बाबा व रा.प्रधान यांनी केले.ही किर्ती जगत्रयी व निजाम उल्मुक व दिल्लीपावेतो जाहली.हा लौकिक जेनेकरुन कायम राहणे ते करने.”
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना सातारला घेऊन येण्याची महत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर शाहू महाराजांनी टाकली होती,त्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे फत्तेसिंह बाबा.
फत्तेसिंहराजे सातार्यात आले किंवा सातारा येथुन जात असतील तर सातारा च्या पुढे येऊन प्रधान व प्रतिनिधी याना वर्दी द्यावी लागायची एवढा मोठा शिरस्ता छत्रपती शाहु महाराज यानी घालुन दिला होता...
इ.स.1737 ला कर्नाटक स्वारीत मराठ्यांना विजय मिळाला.या लढाई मधे फत्तेसिंहांनी पराक्रम गाजवला.या पराक्रमाचे वर्णन नाना पुरंदरे आपल्या (पेशव्यांना लिहिलेल्या) पत्रातून करतात..
‘ऐसीयास फत्तेसिंहबाबांचा कारभार आहे,तो स्वामी जाणतात.त्यांचे सर्व साहित्य मन्सूब्याने आपन केले पाहीजे.’
फत्तेसिंह बाबांना अक्कलकोट बरोबरच बारामतीचीही जहागिरी मिळाली होती.शाहू छत्रपतींच्या मृत्युनंतर फत्तेसिंह बाबा आपल्या जहागिरी मधे,अक्कलकोटास राहन्यास आले..गावाचा विकास केला..शहरीकरण केले..मृत्युपर्यंत त्यांचा मुक्काम अक्कलकोटलाच होता..
आज त्यांच्या मृत्युतारखेविषयी मतमतांतरे आहेत..काही साधनांत ती तारीख 20 नोवेंबर 1760 आहे तर काही साधनांत ती 20 जानेवारी 1760..!!
शाहू छत्रपतींच्या या पराक्रमी मानस पुत्रास मानाचा मुजरा..!!
श्री राजा शाहूचरणी तत्पर
फत्तेसिंह भोसले राजकूमर..!!

No comments:
Post a Comment