विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2019

छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत महत्वाच्या जागांवर कोण अधिकारी होते

या लेखात अत्यंत महत्त्वाची दुर्मिळ माहिती आहे🙏

🚩🚩चला तर जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत महत्वाच्या जागांवर कोण अधिकारी होते त्यांचे सैन्य, नाविक दल किती होते, गडकोटांवर रसद कशी पुरवीत आणि लढाईची पद्धत कशी
होती ते आपण पाहू.
शंभुराजे स्वतः जंजिरा, चेउल, तारापूर, फोंडा, सांतु इस्तेव्ह, खेळणा, बाणावर, व श्रीरंगपट्टण या आघाड्यांवर गेले होते. १६८८ साली शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात ते जातीने हजर होते.
आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य अधिकारी कोण कोण होते ते पाहू.
१. हंबीरराव मोहिते. हे सरनोबत असून मराठ्यांच्या सर्व आघाड्यांवर लक्ष ठेवत असत. कल्याण भिवंडी, रायगड, कोल्हापूर, पन्हाळा या ठिकाणच्या आघाड्या त्यांनी सांभाळल्या.
निळो मोरेश्वर पेशवे यांनी कल्याण भिवंडी, चेउल येथील आघाडी सांभाळली.
१६८५ साली निळोपंतांच्या
नेतृत्वाखाली बऱ्हाणपुरावर छापा घालण्यात आला.

२. सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी फोंड्याची आघाडी सांभाळली.

३. खंडो बल्लाळ याने गोव्याच्या आघाडीवर संभाजी महाराजांना मदत केली.

४. कवी कलश याने रायगड, पन्हाळा, आणि गोवा येथील आघाड्या सांभाळल्या.
मुगलांबरोबर संगमेश्वर येथे झालेल्या चकमकीत त्याला बाण लागला.

५. सर्जेराव जेधे आणि वाईच्या देशमुखांनी मावळ प्रांत आणि रोहिड्याची आघाडी सांभाळली. कोथळागडावर लढत असलेला नारुजी त्रिंबक मारला गेला.

६. सरदार भीमराव साताऱ्याच्या परिसरात लढत होता. नोव्हेंबर १६८४ च्या सुमारास नारुजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली २००० घोडदळ साताऱ्यास त्यांच्या मदतीसाठी होते.

७. बारदरमल ह्या सरदाराने पुण्याचा बंदोबस्त केलेला होता.

८. कृष्णी दादाजी नरस प्रभू याने दंडाराजपुरी, शिरवळ, मावळ, आणि संगमेश्वर येथे मर्दुमकी गाजविली.

९. रुपाजी भोसले याने रामसेज, कल्याण, भिवंडी, रायगड, कोल्हापूर आणि पन्हाळा येथे मुगलांना पराभूत केले.

१०. लालबेगचा मुलगा मलिक बेग हा १६८४ पूर्वी मराठ्यांच्या सैन्यात अधिकारी होता. त्याच्या हाताखाली १००० मुसलमान घोडेस्वार आणि तिरंदाज होते. त्याला वर्षाकाठी १५०० होन आणि त्याचा सहाय्य्क शेख हुसेन याला वर्षाला ५०० होन पगार होता.

११. रामसेजचा किल्लेदार रूपा मोजदा याने रामसेजचा वेढा उठविला.

१२. मानाजी मोरे आणि संताजी जगताप हे रुपाजी मोजदास मदत करीत होते.

१३. सरदार तुकोजी कल्याण भिवंडी येथे लढत होते.

१४. जानराव जानोजी हे विजापूच्या बाजूस लढत होते.

१५. सरदार हिम्मतराव कदम यांनी संगमनेरच्या बाजूस चढाई केली.

१६. हंबीरराव मोहित्यांच्या निधनानंतर मालोजी घोरपडे सरनौबत झाले. मालोजी, त्यांचा मुलगा संताजी आणि विठोजी चव्हाण यांनी संगमेश्वर येथे मुगलांशी लढाई केली.

१७. कोपळचा खान गौडा देसाई आणि हुकेरीचा देसाई यांनी कोपळ, भुजबळगड, कोल्हापूर येथे मुगलांना हटविले.

१८. हरजी राजे महाडिक यांनी कर्नाटकातील मुलखाचा बंदोबस्त केला. त्यांच्या बरोबर शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, आणि दादाजी काकडे हे मदतीला होते.
डिसेंबर १६८४ मध्ये दादाजी काकडे यांनी ३००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन तालुका सकीला मन्नूर (किंवा मद्दुर) येथे लढाई केली. येथील लढाईत ते आणि त्यांचा मुलगा मारला गेला.
त्यांचा दुसरा मुलगा समाजी याला शत्रूने पकडले. याच लढाईत मराठ्यांचा आणखी एक सरदार पेमाजी हा जखमी झाला.

१९. केशव त्रिमलने कल्याण भिवंडी आणि रामसेजच्या आघाडी सांभाळली. १६८६ मध्ये त्याला कर्नाटकात हरजी राजे महाडिकांच्या मदतीला पाठविण्यात आले.🚩🚩

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...