विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2019

छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेसचे मराठ्यांचे सैन्यबळ

🚩आता आपण

🚩🚩छत्रपती संभाजी राजे पन्हाळ्यावरुन प्रथम ( म्हणजे जुलै १६८०) रायगडला गेले तेंव्हा त्यांच्याजवळच्या सैन्याची संख्या २०,००० होती.
निरनिराळ्या आघाड्यांवरील सैन्याचे जे आकडे उपलब्ध आहेत ते पाहू.

१. बऱ्हाणपुरावर छापा घालण्यासाठी ३०,००० सैन्य गेले होते.

२. १२,००० मराठ्यांनी बालाघाटाजवळ कांसा येथे मुगलांबरोबर लढाई केली. संभाजी राजांनी २०,००० सैन्य घाटाच्या अलीकडे जास्तीचे म्हणून तयार ठेवले होते.

३. रामसेजजवळ सैन्याची मोठी तुकडी लढाईच्या तयारीत होती. या वेढ्यात ७००० सैन्याच्या तुकडीने रामसेजच्या एका बाजूला हल्ला केला. याशिवाय १००० ची अतिरिक्त सैन्याची कुमक रामसेजला पाठविण्यात आली.

४. १०,००० मराठा सैन्याने भीमा नदी ओलांडून मुगलांच्या ताब्यातील सोलापूर लुटले.

५. परत संभाजी राजानी ६००० सैन्याची तुकडी सोलापूर लुटण्यासाठी धाडली होती.

६. ५००० मराठ्यांनी अहमदनगरावर हल्ला करून शहर लुटले.

७. १०,००० मराठा सैनिक मलकाथवर चालून गेले.

८. संभाजीराजांबरोबर असलेल्या १००० घोडदळ आणि २००० पायदळाने तारापुरवर हल्ला केला.

९. खवासपूर येथे २०,००० मराठा सैन्य हजर होते.

१०. ६००० पायदळ आणि २००० घोडदळच्या तुकडीने चेऊलवर हल्ला केला होता.

११. संभाजीराजे फोंडा येथे गेले त्यावेळी त्यांच्याजवळ १५,००० मराठा सैनिक आणि ५ हजार घोडदळ होते. गोव्यात मराठ्यांची एकूण फौज २०,००० होती. संभाजी महाराजांनी फोंडा किल्यात ६०० बंदूकधारी(Musketeers) मराठा सैन्य ठेवले होते.
ह्याशिवाय २०० सैनिक डोंगरात लपले होते.

१२. मराठ्यांनी सांतु इस्तेव्ह वर हल्ला केला तेंव्हा प्रथम ४० लोकांनी गडात प्रवेश केला. नंतर ८०० मराठा बंदूकधारी गड चढून गेले. मागावून ३०० पायदळाची कूमक मदतीला पाठविण्यात आली.

१३. दिनांक ११-१२-१६८३ रोजी १००० घोडदळ आणि ३००० पायदळाने सालसेत मध्ये प्रवेश केला. अशीच एक मराठ्यांची तुकडी बारदेश मध्येही शिरली.

१४. ७००० घोडदळ आणि ८००० पायदळ कल्याण भिवंडीवर चालून गेले.

१५. २०,००० घोडदळ घेऊन हंबीरराव मोहित्यांनी कोल्हापुरास तळ दिला.

१६. बारलाल (?) च्या नेतृत्वाखाली ५००० घोडदळ नळदुर्ग किल्यावर चालून गेले.

१७. १८,००० मराठा घोडदळ घेऊन जानराव जागोजी विजापूरच्या बाजूस चालून गेला.

१८. १५०० घोडदळाची तुकडी घेऊन हिम्मतराव कदम संगमनेरवर चालून गेला. ( हे कदम देवळाली प्रवराचे. तिथं त्यांना वतन आहे. )

१९. लोहगड विसापूरच्या जवळ असलेल्या मानापुर येथे १२,००० घोडदळ हजर होते.

२०. संभाजी राजांचे ३०० हेर मुंबईच्या परिसरात सारखे पाळत ठेऊन होते.

२१. निळोपंत पेशव्याने ७००० फौज घेऊन बऱ्हाणपुरवर परत छापा घातला.

२२. मराठ्यांची मोठी फौज हरजी राजे महाडिकांच्या बरोबर कर्नाटकात कायम सज्ज असे. १६८३ मध्ये त्यांनी ८००० घोडदळ घेऊन म्हैसूरवर हल्ला केला.

२३. केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे हे १२,००० घोडदळ घेऊन १६८७ मध्ये जिंजी येथे गेले.

२४. हरजी राजे महाडिकांच्या हाताखालच्या २००० घोडदळ आणि ५००० पायदळाने गोवळकोंड्याचा मुलुख घेतला.

२५. २००० घोडदळ आणि ५००० पायदळाने फोर्ट सेंट जॉर्ज ला वेढा घातला.

२६. संभाजी राजांनी आदिलशहाला मदत करण्यासाठी २०,००० घोडदळ तयार ठेवले होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेसचे मराठ्यांचे सैन्यबळ पाहू.🚩🚩

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...