मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 14
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाई शिंदे
ह्यांचा कुलवृत्तांत----------------------4
हणमंतराव पाटणकर ह्यांस दारकोजीराव, हिरोजीराव, आणि धारराव असे तीन पुत्र होते. ते आपल्या वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान् व पराक्रमशाली होते. ह्यांपैकी पहिले दारकोजीराव ह्यांस सात पुत्र होते. त्यांपैकीं रामराव व लक्ष्मणराव ह्यांचा वंश नष्ट झाला; व बाकीचे आपापल्या योग्यतेप्रमाणे नावारूपास आले. ह्या पांच जणांची नांवे येणेप्रमाणे:–बाबूराव, बाळोजीराव, राघोजीराव, बाजीराव व जयरामराव. " ह्यांपैकीं चौथे-बाजीराव हे बायजाबाई साहेबांचे मातामह होत. हे मोठे रणशूर पुरुष होते. पेशव्यांनी अखेरच्या अमदानींत जुन्या मराठेघरा ण्यांतील शूर पुरुषांचा परामर्ष न घेतल्यामुळे अनेक तेजस्वी व बाणेदार |/y 54८.३० -८१ / ८८८८८८ ८. २३ पुरुष निराश झाले, व जिकडे अवकाश मिळेल तिकडे आपली शिपाईगिरी दाखविण्याकरितां निघून गेले. त्यामुळे मराठ्यांचे ऐक्य व तेजस्विता लोपली जाऊन महाराष्ट्रमंडळाचा नाश झाला. अशा पुरुषांपैकीं बाजीराव पाटणकर हे एक होत. पुणेदरबारांत ह्यांच्या शौर्यगुणांचे योग्य अभिनंदन व चीज न झाल्यामुळे हे मुधोजी भोंसले नागपूरकर ह्यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी अनेक पराक्रमाची कृत्ये केली, व भोसल्यांच्या दरबारांत फार लौकिक मिळविला. पुढे बाजीराव पेशवे ह्यांनी त्यांस पाचारण करून पुण्यास आणविलें; आणि त्यांस आपल्या दरबारांत ठेवून घेतले. बाजीरावसाहेबांनी त्यांचे शौर्य पाहून त्यांस मौजे तांबवे हा गांव इनाम दिला. तो त्यांजकडे व त्यांचे बंधु जयरामराव ह्यांजकडे इ. स. १८१८ पर्यंत चालत होता. पुढे इ. स. १८१८ साली महाराष्ट्रामध्ये राज्यक्रांति घडून आली; व पेशव्यांची सत्ता नष्ट होऊन, इंग्रजसरकार महाराष्ट्राचे सार्वभौमप्रभु बनले. त्या वेळी मि० एल्फिस्टन ह्यांनीं, बाजीराव पाटणकर ह्यांची योग्यता व खानदान ही लक्ष्यांत घेऊन, त्यांस तीन हजार रुपये सालीना पेनशन करून दिले. परंतु बाजीराव पाटणकर लवकरच मृत्यु पावले. नंतर त्यांच्या स्त्रीस १२०० रुपये तैनात झाली. ती सातारचे छत्रपति प्रतापसिंह ऊर्फ थोरले महाराज ह्यांच्या कारकीर्दीपर्यंत चालत होती.
बाजीराव पाटणकर ह्यांस सुंदराबाई ऊर्फ नानीसाहेब नामक एक कन्या होती. ती कागलचे जहागीरदार सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांस दिली होती. ही बाई फार साध्वी व सुशील असे. हिच्या पोट सर्जेराव ह्यांस जयसिंगराव व बायजाबाई अशी दोन अपत्ये झाली. जयसिंगराव ह्यांचा जन्म इ. स. १७७९ ह्या साली झाला; व बायजा १. मेजर जी. मालकम कोल्हापुरचे अक्टिग पोलिटिकल सुपरिंटेंडंट ह्यांनी ता० ३ जुलै इ. स. १८५४ सालीं सरकारास कोल्हापूर प्रांतांतील जहागिरीबद्दल जो रिपोर्ट केला आहे, त्यांत जयसिंगराव बाबासाहेब ह्यांचे वय ७५ वर्षांचे दिले आहे. त्यावरून हा सन सिद्ध होतो. २४ - बाई ह्यांचा जन्म इ. स. १७८४ साली झाला. बायजाबाईच्या बाळ पणाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती देता येत नाहीं. तथापि ती लहानपणीं फार बाळसेदार व दखणी असून, तिजवर सुंदराबाईचे फार प्रेम होते, एवढे सांगण्यास हरकत नाहीं.
No comments:
Post a Comment