विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 48


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 48
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------14
मेजर जोसेफ आलेक्झांडरः---ह्यास जोशी शिकंदर' किंवा ८८सवाई शिकंदर” असे ह्मणत. हा पूर्वी जान बत्तिसाच्या सैन्यामध्ये एक लहानसा सेनाधिकारी होता. परंतु जान बत्तीस ह्याजवर मध्यंतरीं दौलतराव शिंदे ह्यांची इतराजी झाली व त्याचे सेनाधिपत्य त्यांनी काढून घेतले, त्या वेळीं ह्यास सर्व कंपूचे आधिपत्य देण्यात आले. ते त्याजकडे पष्कळ वर्षे होते. पुढे इ. स. १८२१ साली, बुंदेलखंडांतील एका राजाचे व जोशी शिकंदर ह्याचे भांडण झाले. त्या वेळीं ब्रिटिश सरकार मध्ये पडून त्यांनी शिंदे सरकाराकडून त्यास ग्वाल्हेरीस परत बोला७० विलें; व त्यास खुद्द ग्वाल्हेर येथे ठेवविलें. ह्याच्या ताब्यात दोन जंगी कंपू आणि दोनशे घोडेस्वार असत. बायजाबाईसाहेबांनी त्याच्याकडे तेवढेच सैन्य ठेविलें. |
बायजाबाईसाहेब ह्यांनी ह्या सर्व मुत्सद्यांच्या व सरदारांच्या साहाय्याने ग्वाल्हेरचा राज्यकारभार पाहण्यास आरंभ केला. त्यांनी राज्यसूत्रे हाती घेतली नाहींत तोंच त्यांच्या पुढे दोन महत्त्वाचे राजकीय प्रश्न उपस्थित झाले. महाराज दौलतराव शिंदे हे मृत्यु पावल्यानंतर त्यांच्या पश्चात् ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास ब्रिटिश सरकाराने बायजाबाईसाहेब यांस पूर्ण मोकळीक दिली. परंतु त्यांनी दक्षिणेतील शिंद्यांच्या ताब्यांतील गांव जे दौलतरावांच्या हयातीपर्यंत त्यांजकडे चालविले होते, ते सोडून देण्याबद्दल बायजाबाईसाहेब ह्यांचे जवळ बोलणे लाविलें, व कांटिंजंट फौजेच्या खर्चाची तजवीज करण्याबद्दल तगादा लावला. ह्या दोन्ही प्रश्नांचा समाधानकारक निकाल करणे फार कठीण होते. ज्या वेळी इ. स. १८०३ सालीं सुर्जीअंजनगांव येथे तह झाला, त्या वेळीं असे ठरले होते की, शिंद्यांच्या घराण्याकडे पूर्वापार चालत आलेले जे इनाम गांव व बाबती व सरदेशमुखीचे हक्क आहेत, ते कायम ठेवून, बाकीचे गांव इंग्रजांच्या स्वाधीन करावेत. परंतु पुढे ह्या इनाम गांवांबद्दल वाद उपस्थित झाला. तहाच्या इंग्रजी कागदांतील कलमांत, ‘‘इनाम' ह्या शब्दाचा उल्लेख न करितां फक्त “शिंद्याकडे चालत आलेले गांव” असेच ह्मटले होते. त्यावरून शिंद्यांच्या तांब्यांतील कोणते गांव सोडावे व कोणते न सोडावे | ह्याबद्दल वाद उत्पन्न झाला. अखेर ह्या संदिग्ध प्रश्नाचा इ. स. १८२२ मध्ये असा निकाल झाला कीं, दौलतराव शिंदे जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत त्यांच्या ताब्यात असलेले सर्व गांव त्यांजकडे चालवावे व त्यांचे पश्चात् । त्यांचे खासगत इनाम गांव खेरीजकरून, बाकी सर्व गांव खालसा करावेत. त्याप्रमाणे दौलतराव शिंदे वारल्यामुळे त्यांचे पश्चात् दक्षिणेतील गांव खालसा करण्याबद्दल हिंदुस्थान सरकारचा ता. २४ मार्च इ. स. १८२८ रोजी नवीन ठराव होऊन आला. तो ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बायजाबाईसाहेब ह्यांस सादर केला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...