विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 14 March 2020

रंगो बापूजी




रंगो बापूजी गुप्ते ……..1857 च्या बंडाचा मराठी चेहरा जो आपल्या ला कधी इतिहासात शिकवाला नाही ,जे चक्क 14 वर्ष इंग्लंड मध्ये राहिले नि संसदेत भांडले(.1839 ते 1853 मध्ये )
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबध
दादाजी नरसप्रभू देशपांडे हे शिवरायांचे बालमित्र ,देशपांडे हा त्यांचा हुद्दा होता. मूळ आडनाव गुप्ते. दादाजी दीर्घायुषी होते. त्यामुळे शिवरायांनंतर छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतही त्यांनी स्वराज्यात सेवा केली. पुढच्या पिढय़ांनीही निष्ठापूर्वक स्वराज्याचीच सेवा केली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचा प्रचंड रणसंग्राम मध्ये दादाजींचे नातू रामाजी कृष्णाजी गुप्ते हेही होते.रामाजींचे पुत्र बापूजी आणि त्यांचे पुत्र रंगो म्हणजेच प्रस्तुत ‘रंगो बापूजी’ .
पूर्वेइतिहास
सातारच्या गादीवरचे शेवटचे छत्रपती महाराज प्रतापसिंह राजे भोसले (सन १७९३ ते सन १८४७) यांच्या दरबारातले रंगो बापूजी एक निष्ठावंत मानकरी होते. या छत्रपती कारकीर्दीचा धब्बा म्हणजे दुसरा बाजीराव या ने पेशववाई बुडवली , मराठी सरदारांच्या भांडायचे शिंदे विरुद्ध होळकर ,होळकर विरुद्ध भोसले ,भोसले विरुद्ध पवार यांचा फायदा इलफिन्स्टिन, रॉबर्ट ग्रँट आदी इंग्रज मुत्सद्यांच्या कावेबाज कारस्थानांच्या उठवला नाही तर नवल एल्फिन्स्टनने पेशवाई बुडवली. रॉबर्ट ग्रँटने छत्रपती प्रतापसिंहांना पदच्युत करून महाराष्ट्रापासून दूर काशीला नेऊन स्थानबद्धतेत ठेवले. १८१८ ला मराठा साम्राज्य संपले दुसरे बाजीराव ला पुणे सोडून बिठुर ला जावे लागले .१८५७ पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते; गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली; त्याच मुद्द्यावर दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला;
तसे पाहिले तर रॉबर्ट ग्रँट किंवा इतरही इंग्रज हे इंग्लंडमधल्या सत्ताधारी सरकारचे नोकर नव्हते, तर ब्रिटिश सरकारच्या संमतीने हिंदुस्थानशी व्यापार करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ या एका खासगी कंपनीचे नोकर होते
इंग्लंड ला रवाना
त्यामुळे कंपनीच्या नोकरांनी हिंदुस्थानात केलेल्या अन्याय, अत्याचारांची दाद ब्रिटिश संसदेसमोर लावावी, अशा उद्देशाने छत्रपती प्रतापसिंहांनी रंगो बापूजी या आपल्या विश्वासू मुत्सद्याला लंडनला पाठवले. सन १८४० साली रंगो बापूजी लंडनला गेले. आपल्या राजाची बाजू ब्रिटिश पार्लमेंटसमोर मांडण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. प्रथम दुभाषामार्फत आणि वर्षा-दोन वर्षांत स्वतःच इंग्रजी भाषा आत्मसात करून रंगो बापूजी न्यायासाठी धडपडत राहिले. इकडे सन १८४७ साली छत्रपती प्रतापसिंह स्वर्गवासी झाले. पण रंगो बापूजी परत न येता लंडनमध्येच इंग्रजी सत्ताधीशांचे बंद दरवाजे जिवाच्या आकांताने ठोठावीत राहिले. इंग्रजांनी त्यांचे कौतुक केले. अनेक सज्जन इंग्रज अधिकारी, खासदार त्यांचे मित्र बनले. त्यांनी पार्लमेंटमध्ये रंगो बापूजींची बाजू मांडलीदेखील. पण काहीही झाले नाही. कारण काही करायचेच नाही, असा मुळी निर्णय झालेला होता. अखेर रंगो बापूजी निराश होऊन सन १८५३ साली सातारला परतले. इंग्रजी राज्य कसे चालते, हे तेरा-चौदा वर्षे सतत पाहून अनुभवून रंगो बापूजी परतले होते.
इंग्लंड मधील त्यांचे visiting card
1857 चे बंड आणि बेपत्ता
त्यामुळे इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱया क्रांतिकारकांनी अर्थातच रंगो बापूजींची भेट घेतली. रंगो बापूजी गुप्तपणे उत्तर हिंदुस्थानात गेले. ब्रह्मावर्त ऊर्फ बिठूर या ठिकाणी नानासाहेब धोंडोपंत पेशवे यांची नि त्यांची भेट झाली. रंगो बापूजी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्या मावळातले हजार गडी नि माझे दोन पुतणे, तुमचा निरोप येताच, इकडे रवाना करतो. उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच दक्षिणेत मी नौबतीवर टिपरी हाणतो.’’आणि मग सन १८५७ ची प्रचंड क्रांती झाली. ररअगो बापुनी सातारा पुणे सांगली कोल्हापूर बेळगाव इथे बंड चा सर्वत्र डंका केला. रंगो बापूजींचे दोन पुतणे दिल्लीच्या तुंबळ संग्रामात प्रत्यक्ष लढले. दक्षिणेत मात्र क्रांतीला अनुकूल दान पडले नाही. उत्तरेतही इंग्रजांनी चिवटपणे लढून फासा पलटवला. रंगो बापूजींच्या मुलाला आणि काही सोबत्यांना पकडून फाशी देण्यात आले. खुद्द रंगो बापूजी मात्र कुठे गेले हे इंग्रजांना जंग जंग पछाडूनही कळले नाही. आजही इतिहासाला ते ठाऊक नाही.
छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकारठाकरे याना रंगो बापू यांचे पुस्तक लिहायला सांगितले होते नि तसे वचन घेतले होतें.मात्र ते पुस्तक पूर्ण व्हायला 1948 उजाडले.
ते हे पुस्तक
रंगो बापुनी इंग्लंड मध्ये वास्तव्य मध्ये अतिशय हलखाची दिवस काढले…एकतर पैसे संपलेला आणि हाती यश नाही…कैक वेळ ते उपाशी राहून दिवस काढले.
1]रंगो बापूजी प्रबोधनकार तथाकारे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...