विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

मराठयांनी सर्वप्रथम दिल्लीवर भगवा केव्हा फडकावला? आणि दिल्लीमध्ये मराठयांच्या काही आठवणी






saambhar :-Ashish Mali, रासायनिक अभियंता

दैव नेते आणि कर्म नेते , शिवाजी महाराजांनी संधी नसताना संधी निर्माण केलाय पण नंतर मराठ्यांनी कैक वेळा संधी आल्या होत्या त्याचे उद्देश साधले नाही .
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नन्तर चा मराठ्यांच्या इतिहासाची ओळख म्हणजे “लढाईत जिंकले पण तहात हरले” अशीच आहे. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठी युद्धे जिंकली पण त्यानंतर करावा लागणारा धूर्तपणा नसल्यामुळे मराठी माणूस एकहाती अख्या भारतावर राज्य करू शकला नाही
राजाराम महाराजांनि मराठ्यांनी दिल्ली जिंकावी अशी इच्छा हनमंतराव घोरपडे ह्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात सांगितली होती .
पण दुर्दैवाने मराठ्यांनी एक नाही तर पाचदा दिल्लीवर भगवा आणि जरी पटका फडकावणाच्या पाच संधी घालवल्या. मुघल सत्ता कमजोर झाल्याने सत्तेत आता धर्माला महत्व कमी झाले होते त्यामुळे धर्माच्या आधारावर हिंदूची तेंव्हाही एकत्र आले नाही आणि आता पण एकत्र येत नाही .
पण दिल्लीच्या बसण्यापेक्षा तलवारीच्या जोरावर पराक्रम गाजवावे. चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करावी. ज्याला जमेल त्याने तशी खंडणी वसूल करावी. असा विचित्र मार्ग पत्करला. रजपूत ,शीख आणि जाटांना मराठे दिल्लीच्या गादीवर बसावेत हे कधीच मान्य नव्हते . त्यापेक्षा उध्वस्त झालेल्या मुघलशाहीतला कमकुवत बादशाह बरा अशी भुमिका मराठ्यांनी घेतली.
पहिली संधी
शाहूंमहाराजा च्या काळात बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळात दिल्ली जिंकण्याची पहिली संधी चालून आली. १७१३ मध्ये फारूख शय्यार सय्यद बंधूंच्या मदतीने चुलत्याला म्हणजे जहांदर शहा चा खून करून मुघल सम्राट झाला. पुढे फारूखला सय्यद बंधू नि डोकयावर बसले .फारूखला सय्यद बंधू अब्दुल्ला अली खान याची भिती जरा जास्तच वाटू लागली. त्यांना निझाम विरुद्ध वापरण्याचा फारूखसियारचा बेत केला. पण सय्यद बंधू नि पण राजकारण केले सईद अब्दूल्ला अली खान ह्याने दख्खनच्या मोहिमेवर असताना बाळाजी विश्वनाथ पेशव्याशी तह केला. सप्टेंबर १७१९मध्ये बाळाजी पंतांनी १६००० घोडदळासह दिल्लीवर चाल केली. दोन हजार मराठे मारले गेले पण दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली. इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता . पण शाहू महाराजांच्या निर्देश नुसार पेशव्यांना दिल्लीचे तख्त जिंकायचे नव्हते केवळ चौथाई-सरदेशमुखी मिळवायची होती. सईद बंधूनी फारूखसियारला पकडले, त्याचे डोळे काढले आणि भाल्यावर त्याचे शीर नाचवले.शाहू महाराजणांनी औरंगझेबाला आणि बहादुरशहा ला वचन दिले होते त्याचे मुळे आधी बालाजी नंतर बाजीराव चे हात बांधलं होते

मराठ्यांना दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची दूसरी संधी आली होती ती मार्च,१७३७ मध्ये
मार्चच्या अखेरीस थोरल्या बाजीरावाने थेट दिल्लीवर आक्रमण केली. मराठा फौजा दिल्लीच्या बारापूला व काल्काच्या देवळापर्यंत धडकल्या. मुहम्मद शाह सम्राटाची पाचावर धारण बसली. दिल्लीच्या रकाबगंज भागात मुघलांच्या १०००० सैनिकांच्या पराभव केला. बाजीरावाने नंतर तालकटोरा मैदाने कडे आक्रम केले पण तिथे कमरूद्दीन खान चालून आला पण बाजीरावाने त्याचा पराभव केला . बाजीरावाचा दिल्ली जाळण्याचा इरादा होता शाहू महाराजांचे शब्द आठवून सर्व बेत रद्द केला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटाने ओलीस ठेवलेल्या शाहूची व आई येसूबाईची सन्मानपूर्वक सुटका केली होती.

तिसरी संधी आली होती ती १७५७ साली.
त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर आलमगीर दूसरा हा पळपुटा मुघल सम्राट राज्य करीत होता. अहमदशाह अब्दालीच्या दुसऱ्या स्वारीनंतर नजीब हा अतिशय लबाड प्रवृत्तीचा गोडबोल्या रोहिलाच खऱ्या अर्थाने राज्यकारभार पाहत होता. त्यामुळे इमाद ह्या मुघलांच्या वझीराने रघुनाथरावांशी संधान बांधले. मल्हारराव होळकर सखाराम बापूंनी नि थोर पराक्रम केला . रघूनाथरावांनी लाहोर गेटच्या दिशेने आक्रमण केले तर विठ्ठल सदाशिव यांनी काश्मीरी गेट पडला ; मानाजी पायगुडेंनी काबूलगेटच्या बाजूनी हल्ला केला . चारी बाजूनी मराठ्यांनी लाल किल्ला वेढल्याने नजीब घाबरला आणि वकिल मेघराज मल्हाररावांकडे पाठवून तहाची बोलणी करण्यात वेळ काढूपणा केला. मल्हारराव ने नजीब ला मानस पुत्र मानले होते . रघूनाथरावांचा धीर सुटला. त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दिल्ली वर स्वारी केली. नजीबने हातपाय पडून अखेर रघूनाथरावांना टाळून मल्हाररावांशी तह केला. त्यांनी लाल किल्ला जिंकला मराठ्यांना यावेळी ही दिल्लीच्या तख्तामध्ये रस नव्हता.दोघांनी पंजाब प्रांतात राज्यविस्तार करण्याकडे मोर्चा बांधला.(याच नजीब ने पुन्हा मराठ्यांशी गद्दारी केली आणि पानिपत झाले ) त्यामुळे बहलोल खानाला जिवंत सोडल्याबद्दल शिवाजी महाराजांनी का पत्र लिहले याचे महत्व कळते.
चौथी संधी आली ती १७५९ मध्ये
  • गाझीउद्दीन जो वजीर होता त्याने आलमगीर दूसरा याचा खून केला. आलमगीर दूसरा चा चिरंजीव अली गौहर बिहार पळून गेला. त्याने सदाशिव भाऊ पेशव्याची मदत मागितली. सदाशिवभाऊंनी दिल्लीवर चाल केली शहा जहान तिसरा याला हाकलवाले आणि अली गौहरला शाह आलम दूसरा नावाने मुघल सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले. शाह आलम दूसरा नावापूरताच सम्राट होता. कारण दिल्लीची बादशाही खराब झालेली होती . सदाशिवभाऊंना दिल्ली तख्त जिंकणे अगदीच सोपे होते पण ती इच्छाच त्यांच्या ठायी नव्हती कारण त्या वेळी नजीब आणि दुर्रानी भारताच्या उरावर बसले होते . १७६१ मध्ये पानीपतची युद्ध झाले मराठेशाहीवर कोसळली. त्यात सदाशिवभाऊ गेले. शाह आलम दूसरा याने राज्यविस्तारासाठी बंगालकडे मोर्चा वळवला. पण १७६४ साली बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्ह विरूद्ध त्याचा पराभव झाला. कंपनीने त्याला दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली.
पाचवी संधी आली महादजी शिंदे यांना
  • बक्सारच्या पराभवानंतर शाहआलम दूसरा वणवण फिरत होता.१७७२ मध्ये महादजी शिंदेनी शाह आलम दूसरा ह्यास पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवले. पण मराठ्यांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतले नाही . दरम्यान महादजी रजपूतांशी भांडणात व्यस्त असताना पानीपतातला नजीब उदौला ह्याचा नातू गुलाम कादीर हा रोहिलाखंडचा नवाब सरळ दिल्लीत घुसला. त्याने शहा आलम दूसरा कडून जबरदस्तीने वझीर पदाचे अधिकार घेतले. शाह आलम दूसरा याचा भित्रेपणा जाणून त्याने लाल किल्ल्यातील सम्राटाच्या जनानखान्यातील स्त्रीयांवर बलात्कार केले. अब्रू लुटल्या आणि खजिना ही लुटला. शाह आलमचे डोळे काढले; दाढी सोलून काढली. महादजी शिंदे पर्यंत वार्ता जाईपोवेतो दहा आठवडे लोटले. शेवटी महादजीनेच गुलाम कादीर ह्या ला संपवले
  • पुन्हा असे काही घडू नये म्हणून १७८८ पासून पुढे वीस वर्ष मराठ्यांची फौज लालकिल्ल्याचे रक्षण करण्यासाठी दिल्लीत राहिली मराठे मुघलांचे संरक्षक झाले पण सिंहासनाधिपती किंवा दिल्लीच्या आसनावर बसले नाही .
  • १८०३ च्या दूसऱ्या इंग्रज-मराठे युध्दात मराठ्यांनी दिल्लीचा ताबा गमावला.
पुढे मराठ्यांचे नाव दूसरा बाजीराव पेशवा झाला . यशवंतराव होळकर मराठ्यांच्या सारख्या महान सरदाराला बाजूला ठेवले . पण शिंदे-होळकर-पेशवे आपापसात भांडत राहिले. या तिघांच्या भांडणात दिल्ली तर सोडा आहे ते स्वराज्य लयाला गेले . यशवंतरावांमध्ये ब्रिटीशांना दिल्लीतून हुसकावून लावण्याची हिम्मत आणि इच्छा होतो लॉर्ड वेलेस्ली ज्याने पुढे जाऊन वॉटर्लू युद्धात नेपोलियनचा पराभव केला, त्याने यशवंतरावां पुढे हार मनाली होतो . यशवंतरावाने इंग्रजांविरूद्ध रजपूत, रोहिला ,शिख , मराठा ,जाट एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यशवंतरावांना दिल्ली ब्रिटीशांच्या ताब्यातून सोडवायची होती. पंजाबचे महाराजा रणजितसिंह मदतीला तयार ही झाले पण चाणाक्ष इंग्रजांनी बेत हाणून पाडला. शिंदे-होळकर-पेशव्यांत मनोमिलन घडवणारे द्रष्टा नेता दुर्दैवाने कुणी नव्हते.
saambhar :

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...