विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती भाग 3





नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती
भाग 3
रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.[१] १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.
रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.
१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले.
नागपूरच्या भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी व श्रेष्ठ पुरुष रघुजी भोसले हे होते. रघुजी लहान असताना त्यांचे वडील बिंबाजी हे वारले. छत्रपती राजाराम महाराज यांना नागपूरकर भोसले घराण्याच्या पराक्रमी अशा रूपाजी व त्यांचा पुतण्या परसोजी यांनी मोठी मदत केली होती. त्यांनी गोंडवन , व वर्हाड प्रांतात आपला अंमल बसविला होता. परसोजींच्या पराक्रमा बद्दल छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना " सेनासाहेबसुभा " हा किताब दिला होता. सन 1699 साली गोंडवन, चांदा, वर्हाड तसेच देवगड हे भाग राजाराम महाराज यांनी परसोजींच्या अखत्यारित दिले. शाहु महाराजांच्या कालखंडात परसोजी शाहंना मिळाले. शाहु महाराजांनी त्यांचा " सेनासाहेबसुभा " हा किताब चालू ठेवला. परसोजी वर्हाडात मोहीमेवर जात असताना सन 1709 मध्ये खेड येथे मरण पावले.

२६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले.
स्त्रोत :: https://mr.m.wikipedia.org/wiki/...

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...