दत्ताजी शिंदे :—
भाग 2
उज्जनीहून निघून चुलतेपुतणे दिल्लीस आले. पेशव्यानें त्याला नजीबाचें पारिपत्य, बंगाल काबीज करणें, लाहोर सोडविणें, काशी प्रयाग घेणें व पुष्कळ पैसा घेऊन दादासाहेबानें केलेंले स्वारी कर्ज फेडणें वगैरे कामें सांगितली होती. पेशव्यांचा 'दत्ताजी चित्तावर धरील तें करील' असा त्याच्यावर पूर्ण भरंवसा होता, मध्यंतरी तोफांच्या प्रकरणावरून दत्ताजीचें व गाजीउद्दीनाचें भांडण झालें होते. नंतर त्याने अबदालीच्या सुभेदारापासून लाहोर घेतलें (एप्रिल १७५८) व परत यमुनाकाठी रामघांटास दाखल झाला (मे). यावेळीं सरकारी कर्जाची ५० लाखांची वर्गत त्याच्यावर आली होती.

यावेळी दिल्ली मराठ्यांच्या ताब्यांत कायमची गेल्यासारखी झाल्याने
नजीबाने व बादशहाने गुप्तपणें पत्रे लिहून अबदालीस ताबडतोब बोलाविलें व
दत्ताजीस भागीरथीवर पूल बांधून देण्याच्या गुळचट थापा देऊन स्वस्थ
बसविलें. याप्रमाणें नजीबाने सहा महिने (एप्रिल ते आक्टोबर) पुलाच्या
थापेवर त्याला झुलविलें व त्याच्या विरुद्ध आपली सर्व तयारी चालविली आणि
आंतून सर्व मुसुलमानांशी कारस्थानें करुन नोव्हेंबरांत अबदालीस दत्ताजीवर
आणवून त्यास कैचीत पकडले.
आतां दत्ताजीस नजीबाचे कपट उमगले; परंतु आतां त्याचा कांही उपयोग नव्हता. गंगेचा पूल नजीबाच्या ताब्यांत होता आणि तो तर अबदालीला उघड मदत करीत होता. अशा वेळींहि दत्ताजीने एकाएकीं नजीबावर स्वारी करुन त्याला शुक्रतालाहून हांकलून गंगेपलीकडे रेटलें. ही लढाई मातब्बर होऊन तींत जनकोजी व दत्ताजी दोघेहि जखमी परंतु विजयी झाले (आक्टोबर). यावेळीं नजीबानें त्याच्याशी तात्पुरता तह केला; सुजाने हरिद्वाराच्या गंगेचे नाकें दाबून धरल्याने व अबदाली कुरुक्षेत्रास आल्याने, दत्ताजीनें गंगापार जाण्याचें रहित करुन कुरुक्षेत्री अबदालीची गांठ घेतली (२२ डिसेंबर). याप्रमाणें दत्ताजी हा घेरला गेला व हें सर्व कृत्य नजीबाने केले. त्याचप्रमाणें सुजानेहि एक कोट रु. खंडणी देण्याची थाप देऊन दत्ताजीस शुक्रतालास अबदाली येईपर्यंत अडकवून ठेविलें.

No comments:
Post a Comment