विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ भाग 2

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

भाग 2

महावीर सांगलीकर

राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक या तीन प्रदेशातील लोकांचे, विशेषत: राज्यकर्ते, सैनिक आणि व्यापा-यांचे प्राचीन काळापासून एकमेकांच्या प्रदेशात स्थलांतर होत राहिले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक हे प्रदेश आज राजकीय दृष्ट्या वेगवेगळे असले तरी पूर्वी ते ब-याच वेळा एकछत्री अमलाखाली असायचे. हे दोन्ही प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग असल्याने हे त्या काळातील अनेक राजघराण्यांना ते शक्य झाले.

महाराष्ट्राचे पहिले राजघराणे (इ.स. पूर्व 230 ते इ.स. 220 ) मानले गेलेल्या सातवहानांचे राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या विस्तृत प्रदेशावर पसरले होते. या सातवाहनांचे मूळ आंध्र प्रदेशातील धरणीकोटा व अमरावती येथे आहे. महाराष्ट्रात त्यांची महत्वाची ठिकाणे म्हणजे पैठण आणि जुन्नर. सातवहान हे अगोदर मौर्यांचे मांडलिक होते, पण अशोकाच्या मृत्यूनंतर ते स्वतंत्र झाले.

मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या राजघराण्यांशी संबंधीत कुळ्या दिसतात, पण सातवहान या राजघराण्याशी संबंधीत कुळी दिसत नाही. तशीच ती रजपूतांमध्ये ही दिसत नाही.

सातवहानांनंतरच्या काळात झालेली दोन प्रसिद्ध व बलाढ्य राजघराणी म्हणजे चालुक्य व राष्ट्रकूट ही होत.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...