राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
भाग 3
महावीर सांगलीकर
सोळंकी कुळी
चालुक्यांच्या एकूण तीन शाखांनी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्, आंध्र आणि गुजरात या प्रदेशांवर, तसेच मध्य प्रदेशच्या दक्षिण भागावर राज्य केले. त्यांची प्रसिद्ध राजधानी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामी येथे होती, पण त्या आधी ती महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे होती.
बदामीचे चालुक्य पराक्रमी होते. त्यांच्यापैकी पुलकेशी दुसरा या राजाने उत्तर भारतावर स्वारी केली. तेथे त्याचा सामना सम्राट हर्षवर्धनाबरोबर झाला. त्या युद्धात हर्षवर्धनाचा पराभव झाला.
चालुक्यांच्या एका शाखेने गुजरात मधील अनहीलवाड येथून इ.स. 942 ते 1244 या काळात राज्य केले. तेथे ते सोळंकी या नावाने ओळखले गेले. या घराण्यात मूळराज पहिला, कुमारपाल आणि त्रिभुवनमल्ल हे प्रमुख आणि प्रसिद्ध राजे झाले. आजच्या गुजरात आणि राजस्थान मधील मधील राजपुतांमध्ये तसेच जाट समाजात सोळंकी ही एक प्रसिद्ध कुळी आहे.

No comments:
Post a Comment