विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती भाग 4






नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती
भाग 4
नागपूरला श्रीमंत भोसले नृपतींच्या निवासाचे निश्चित झाल्यावर आद्य रघुजी महाराजांनी येथे राजवाडा बांधण्याचे ठरवले. या राजवाडय़ाचे प्रवेशद्वार म्हणजे आजचे कल्याणेश्वर प्रवेशव्दार. पण, मुळात ही वास्तू नगारखान्याची असून तेथे नगारा, चौघडा निनादत असे. आज प्रवेशद्वाराच्या आत एक अतिभव्य शिवमंदिर दिसते. राजवाडय़ाचा मूळ भाग म्हणजे आजचे गोखले यांचे किराणा दुकान, कल्याणेश्वर देवळाच्या बाजूचा परिसर, महानगरपालिकेची इमारत, नरसिंग चित्रपटगृह, पोस्ट ऑफीस, श्रीमंत फत्तेसिंगराव महाराजांचा राजवाडा, त्यामागील रुक्मिणी मंदिर व मागे अभ्यंकरांच्या घरापुढील ऐतिहासिक भिंत होय.
नागपूर शहराने तीनशे वर्षांंच्या इतिहासात आजतागायत अनेत चढउतार बघितले आहेत. नागपूर शहराचे नामकरण नागनदीवरून झाले असले तरी नाग नदीच्या जवळपास जुनी वस्ती असल्याचे बोलले जाते. अठराव्या शतकाच्या प्रारंभी मराठय़ांचा या नागपूर प्रांतात प्रवेश झाला. तत्पूर्वी, येथे गोंड राजाचे राज्य होते. नागपूरला श्रीमंत भोसले नृपतींच्या आधी साधारणत: १००-१२५ वर्षे गोंडांचे राज्य होते. साहजिकच अनेक प्रकारची बांधकामे या काळात शहरात झाली. त्यात राजवाडे, किल्ले, स्मारक, तटबंद्या, समाधी, देवळे, पूल, वाडे, हुडे, बाग-बगिचे, भिन्न भिन्न बाजारपेठांचा अंतर्भाव होतो. १७०२ मध्ये बख्त बुलंद शहाने देवगडची राजधानी नागपूरला हलवून नागपूरचे नविनीकरण केले. त्यापूर्वी नागपूर हे एक परगण्याचे ठिकाण होते. शेवटचा गोंड राजा बुऱ्हाणशाह यांच्या नावावरून बुऱ्हाणशहा किल्ला म्हणून आजही महालातला किल्ला ओळखला जातो. २४ जानेवारी १८६४ मध्ये भोसल्यांचा राजवाडा जळून खाक झाला. जुन्या वाडय़ाचा काळ्या दगडाचा दरवाजा आजही दिसतो. मुख्य महालाच्या जागेवर आज टाऊन हॉल आणि महापालिकेचे कार्यालय, राष्ट्रीय वाचनालय, बगिचा आणि नरसिंग चित्रपटगृह आहे. राजे लक्ष्मणरावांच्या वाडय़ाकडे बुधवार बाजारातून जो रस्ता जातो तो पूर्वी महालाचाच भाग होता. वाडय़ाला दगडी परकोट व एकच दार होते. ज्या ठिकाणी बाकाबाईचा वाडा होता त्या ठिकाणी पूर्वी निलसिटी आणि सध्याचे धनवटे नगर विद्यालय आहे. पाताळेश्वराचा दगडी दरवाजा ते वाडय़ाचे प्रवेशद्वार होते. श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची इमारत मूळ चंदाजी भोसल्यांच्या वाडय़ाची आहे.
नागपूरला श्रीमंत भोसले नृपतींच्या निवासाचे निश्चित झाल्यावर आद्य रघुजी महाराजांनी येथे राजवाडा बांधण्याचे ठरवले. या राजवाडय़ाचे प्रवेशद्वार म्हणजे आजचे कल्याणेश्वर प्रवेशव्दार म्हणून ओळखली जाणारी भव्य वास्तू होय पण, मुळात ही वास्तू नगारखान्याची असून तेथे नगारा, चौघडा निनादत असे. श्रीमंतांचे नगरात आगमन किंवा स्वारीवर निघण्याआधी सर्व परिसर या निनादाने दणाणून जात असे. आज प्रवेशद्वाराच्या आत एक अतिभव्य शिवमंदिर दिसते. राजवाडय़ाचा मूळ भाग म्हणजे आजचे गोखले यांचे किराणा दुकान, कल्याणेश्वर देवळाच्या बाजूचा परिसर, महानगरपालिकेची इमारत, नरसिंग चित्रपटगृह, महाल पोस्ट ऑफीस, श्रीमंत फत्तेसिंगराव महाराजांचा राहता राजवाडा त्यामागील रुक्मिणी मंदिर व मागे अभ्यंकरांच्या घरापुढील ऐतिहासिक भिंत होय. ज्या नागपूरच्या (महाल) प्रवेशद्वारास आज गांधी गेट म्हणतात तो दरवाजा म्हणजे श्रीमंत भोसलेंचा शुक्रवार दरवाजा होय. हे प्रवेशद्वार श्रीमंतांच्या या नागपूर नगरीचे वैभव असून तो दगडांनी बांधलेला आहे. श्रीमंतांच्या वाडय़ाच्या परकोटास अनेक दरवाजे होते. त्यात शुक्रवार दरवाजा, बुधवार दरवाजा, (नगारखाना) आदितवार दरवाजा, (चितार ओळीत) भंडारा दरवाजा, भुत्या दरवाजा (दसरा रोड) यांचा अंतर्भाव होतो. हा दरवाजा शुक्रवार तलावाजवळ असल्याने यास शुक्रवार दरवाजा, असे म्हणत. प्रथम रघुजी महाराजांचे नागपूरला कायम वास्तव्य झाल्यावर हे द्वार बांधले गेले.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...