विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ भाग 4

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

भाग 4

महावीर सांगलीकर

राठोड कुळी
राष्ट्रकुटांचे (इ.स. 753 ते 982 ) साम्राज्य दक्षिण समुद्रापासून उत्तरेत कनोज पर्यंत पसरले होते. त्यांची पहिली राजधानी आजचे कंधार (नांदेड) ही होती, नंतर ती गुलबर्ग्याजवळ मलखेड येथे नेण्यात आली. पुढे कनोजच्या राष्ट्रकुटांच्या विविध शाखांनी राजपुताना, मालवा, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात अशा अनेक भागांवर राज्य केले. ही सर्व राजघराणी राठोड या नावाने ओळखली जातात. राष्ट्रकुटांचे मूळ नाव रट्टउड असे आहे, त्याचाच अपभ्रंश राठोड हे नाव होय. राष्ट्रकूट हा मूळ मरहट्टी भाषेतील रट्टउड या शब्दाचा अपभ्रंश आहे. उत्तरेत राठोडांच्या एकूण 24 शाखा असून राठोड कुळीच्या राजपुतांना खूपच प्रतिष्ठा आहे.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...