विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 April 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 72

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग  72

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति" व बायजाबाईसाहेबांचा वनवास-------4पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे ...बायजाबाई शिंदे राणोजी शिंदे ...
 
 बायजाबाई रेसिडेन्सीमध्ये आल्यानंतर, ब्रिटिश रेसिडेंट मि० क्याच्हेंडिश ह्यांनी त्यांस ग्वाल्हेर सोडून बाहेर जाल, तर महाराज जनकोजीराव ह्यांचेकडून तुह्मांस कांहीं उपद्रव होणार नाही, असे अभिवचन दिले; त्यांना आपखुषीने किंवा खुषीच्या सक्तीनें ग्वाल्हेर संस्थानच्या बाहेर पाठविले. बायज़ाबाईसाहेब ह्यांजवर ह्या वेळी महसंकट आल्यामुळे त्यांना नाइलाजास्तव ब्रिटिश रेसिडेंटाचे ह्मणणे कबूल करावे लागलें, तत्काळ त्या ग्वाल्हेर सोडून प्रथमतः सहा मैल अंतरावर कसोली ह्मणून गांव आहे तेथे गेल्या; तेथून धोलपुरास गेल्या. धोलपूर येथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला ब्रिटिश सरकारास विनंतिपत्रे पाठवून आपली दाद घ्यावी ह्मणून विनंति केली. परंतु तिचा कांहींएक उपयोग झाला नाही. उलट, त्या परत ग्वाल्हेरीस येऊन कांहीं गडबड करतील ह्मणून त्यांस आग्यास दूर अंतरावर पाठविले. धोलपुराहून त्या गेल्या, त्या वेळी त्यांचेजवळ ५००० पायदुळ १००० घोडेस्वार होते. आग्र्यास गेल्यानंतर बायजाबाईसाहेब .. ह्या रिकाबागंजामध्ये बिद्दीचंद्र शेट ह्यांच्या वाड्यांत राहिल्या होत्या. ग्वाल्हेरीहून आग्यास जाईतोंपर्यंत त्यांचे प्रवासामध्ये फार हाल झाले ब्रिटिश सरकारच्या गैरमर्जीचीं कटु फलेंही अनुभवण्याचे त्यांस अनेक प्रसंग आले. ......... बायजाबाईसाहेब ग्वाल्हेरीहून गेल्यानंतर ब्रिटिश रेसिडेंट मि० क्याव्हॅडिश ह्यांनी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस राज्यारूढ करून सर्व मुखत्यारी दिली. महाराज जनकोजीराव हे ग्वाल्हेरच्या सैन्याच्या प्रमुख अधिका-यांच्या सर्वस्वी आधीन होऊन त्यांच्या तंत्राने वागू लागले. त्यामुळे ते अधिकारी फार प्रमत्त होऊन, ग्वाल्हेरचे राज्य ह्मणजे केवळ लष्करी लोकांचे साम्राज्य झाले. महाराजांनीं नारोपंत आपटे ह्यांस दिवाणगिरीची वस्त्रे दिलीं, रामराव फाळके, बळवंतसिंग मुनशी, मुल्लाजी शेट, उदाजी खडके, भाऊ पोतनीस वगैरे लोकांस दरबारांतील अधिकाराची कामें दिली. परंतु त्यांची एकंदर कारकीर्द अस्वस्थतेची बेबंदशाहीची होऊन राज्यामध्ये एकसारखे तटेबखेडे दगंधोपे चालले होते. महाराजांनी बायजाबाईच्या वेळचे खजिन्याचे प्रमुख अधिपति मणीरामशेट ह्यांस कैद केले त्यांचा फार छल केला; त्याचप्रमाणे बायजाबाईच्या लोकांचाही फार छल केला. तात्पर्य, बायजाबाईच्या पश्चात् ग्वाल्हेर येथे बिलकूल शांतता राहून प्रजा फार असंतुष्ट झाली. ह्या वेळीं ग्वाल्हेर दरबारांतील सर्व राजकारणांवर एकसारखी नजर ठेवण्यास मि० क्याव्हेंडिश ह्यांच्यासारखे खबरदार रेसिडेंट होते, ह्मणून रक्तपातासारखे भयंकर अनर्थ गुदरले नाहींत, हे भाग्यच समजले पाहिजे
 ग्वाल्हेर सोडल्यापासून बायजाबाईंच्या पाठीमागे एकसारखे दुर्दैव लागले होते. आग्र्यास गेल्यानंतर त्यांची एकुलतीएक मुलगी चिमणा११० बाईसाहेब ही ता. १४ आक्टोबर . . १८३३ रोजी बाळंत होऊन मृत्यु पावली. तिच्या मृत्यूनें बायजाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे झाले. ही मुलगी फार सुस्वरूप सुस्वभावी अशी होती. बायजाबाईची हिजवर अत्यंत प्रीति असून, ती केवळ त्यांना जीव की प्राण वाटत असे. अशा मुलीच्या मृत्यूने त्यांची स्थिति अतिशय करुणास्पद हृदयद्रावक व्हावी हे साहजिक आहे. स्वातंत्र्यहीन राज्यहीन होऊन त्यांत आणखी प्रियकर अपत्याचा विरह व्हावा, ह्यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट कोणती आहे ? दुर्दैवाने दुःखपरंपरा सुरू झाली ह्मणजे ती मनुष्याचा कसा छल करिते, ह्याचे उदाहरण ह्या अभागी राजस्त्रीच्या अनुभवावरून घेण्यासारखे आहे. कवि मोरोपंत ह्यांनी एके ठिकाणीं ह्मटले आहेः आर्या. अनुकूल दैव असतां समर्थ करावयास हानि यम होतां तें प्रतिकूल प्रबलहि दुर्बलचि होय हा नियम हे अक्षरशः खरे आहे.

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...