विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 April 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 75

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग  75

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------1Vishal Shinde - श्रीमंत महाराणी ...
 मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती ...


बायजाबाईसाहेबांच्या राजकीय चरित्राविषयीं ह्मणजे त्यांच्या राज्यकारभाराविषयीं जी माहिती उपलब्ध झाली आहे, ती स्वतंत्र भागांत निवेदन केली आहे. आता त्यांच्या खाजगी चरित्राविषयीं-ह्मणजे स्वभाव, दिनचर्या, वर्तनक्रम, औदार्य वगैरे गोष्टींविषयीं दोन शब्द सांगणे जरूर आहे. बायजाबाईसाहेब ह्यांची दिनचर्या किंवा रोजनिशी लिहून ठेविलेली अद्यापि उपलब्ध झालेली नाही. तेव्हा त्यांच्या खाजगी चरित्राबद्दल पाश्चिमात्य लोकांनी आपल्या प्रवासवृत्तांतामध्ये जी माहिती लिहिली आहे जे उल्लेख नमूद केले आहेत, त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहणे भाग आहे. अशा प्रकारचे पाश्चिमात्य ग्रंथकारांचे लेख ग्वाल्हेर दरबारातील माहितगार जुन्या लोकांच्या मुखांतून ऐकलेल्या आख्यायिका ह्यांच्या आधाराने हा भाग तयार केला आहे. | स्वरूप. बायजाबाईसाहेब ह्या फार सौंदर्यवती होत्या अशी ख्याति आहे. ह्यांच्या लावण्यास लुब्ध होऊन दौलतराव शिंदे ह्यांनी तत्प्राप्त्यर्थ शेवटच्या बाजीरावास गादीवर बसविलें, त्यांचे वडील सर्जेराव घाटगे ह्यांस आपली दिवाणगिरी दिली, ही गोष्ट मागें सांगितलीच आहे. ह्यांच्या रूपगुणसंपन्नतेसंबंधाने एका एतद्देशीय ग्रंथकाराने ही शहाणी, सद्गुणी, सुशील तशीच लावण्यरूपवती होती ? असे वर्णन केले आहे. कित्येक आंग्ल स्त्रियांनीही ह्यांच्या स्वरूपाचे दरबाराचे प्रसंगानुरूप जें वर्णन लिहिले आहे, त्यांत बरीच विस्तृत माहिती दिली आहे. १९ मिसेस फेनी पार्ल्स नामक एका आंग्ल युवतीने बायजाबाईसाहेबांची ता. १२ एप्रिल . . १८३५ रोजीं फत्तेगड येथे भेट घेतली. त्या भेटीच्या वर्णनांत त्यांच्या स्वरूपाबद्दल पुढे लिहिल्याप्रमाणे उल्लेख केला आहेः-_“महाराणीसाहेब ह्या भरगच्चीच्या गादीवर आपली नात गजराजासाहेब हिला घेऊन बसल्या होत्या. त्यांच्यासभोंवतीं त्यांच्या परिचारिका उभ्या होत्या; आणि शिंदे सरकारची तरवार त्यांच्या गादीवर त्यांच्या पायाजवळ ठेविली होती. आह्मी त्यांच्याजवळ जातांच, आमचा आदरसत्कार करण्याकरिता त्या उठून उभ्या राहिल्या, आपल्यासन्निध त्यांनी आह्मांस जागा घेतली. बायजाबाईसाहेब ह्या -याच वृद्ध झाल्या असून त्यांचे केश शुभ्र झाले आहेत; त्यांचे शरीर किंचित् स्थूल झाले आहे. त्या आपल्या तारुण्यामध्ये फारच सुंदर असल्या पाहिजेत. त्यांचे हास्य अतिशय मधुर असून त्यांचे बोलणेंचालणे विशेष चित्ताकर्षक आहे. त्यांचे हातपाय लहान असून, फार नाजूक सुंदर आहेत. त्यांची मुखचर्या फार शांत आणि निष्कपट असून, त्यांच्या मुद्रेवर जें स्वातंत्र्य आणि जी प्रगल्भता दिसत होती, तिची मला फार प्रशंसा केल्यावाचून राहवत नाहीं. हे गुण अफू खाऊन सदैव सुस्त निद्रावश झालेल्या मुसलमान स्त्रियांच्या चेह-यावर मला दिसून आले नाहींत.

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...