विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 April 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 76

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग  76

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
 बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------2
 
 
 दुसरी आंग्ल स्त्री धि ऑनरेबल एमिली ईडन हिने ता. डिसेंबर . . १८३७ रोजी अलहाबाद मुक्कामीं हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड ऑक्लंड ह्यांचेबरोबर बायजाबाईसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं तिने ‘‘बायजाबाई ह्या वृद्ध असून दिसण्यांत हुशार आहेत, त्यांचे चेह-यावर सौंदर्याचा अंश अद्यापि कायम आहे ' असे वर्णन केले आहे. ह्यानंतर . . १८५८ सालीं मिसेस ड्युबल नामक दुस-या एका आंग्ल युवतीने बायजाबाईची भेट घेतली होती. त्या प्रसंगी तिने त्यांच्याबद्दल असा उल्लेख केला आहेः–“बायजाबाईसाहेब ह्या पडद्याजवळ उच्च स्थानी बसल्या होत्या. त्यांच्या साधेपणामुळे त्यांच्या प्रौढ गंभीरवर्तनामुळे माझे लक्ष्य चटकन् त्यांच्याकडे गेले. त्यांचे नेत्र अद्यापि विलक्षण तेजस्वी दिसतात; त्यांकडे पाहून, प्रकाशामध्ये द्राक्षार्क धरिला असतां त्याची जी चमक दृष्टीस पडते, तिचे मला स्मरण झाले. त्यांचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक आहे; परंतु त्यांच्या जास्वल्य आणि राजकारणप्रचुर तारुण्यावस्थेत त्यांच्या ठिकाणीं जो उत्साह होता, तो अद्यापि कायम आहे. ज्या अर्थी आंग्ल स्त्रियांनी बायजाबाईसाहेबांच्या उतारवयामध्ये देखील त्यांच्या स्वरूपाबद्दल इतके चांगले उद्गार काढिले आहेत, त्या अर्थी तारुण्यावस्थेत ते अप्रतिम असले पाहिजे हे उघड आहे. |
 पोषाख राहणी. बायजाबाईसाहेब ह्यांचा पोषाख राहण्याची तन्हा फार साधी असे. दौलतराव शिंदे वारल्यानंतर त्यांनी केव्हाही अलंकार धारण केले नाहीत. त्या मोठ्या पतिनिष्ठ होत्या त्यांच्यावर त्यांच्या पतीचे प्रेमही पराकाष्ठेचे होते. ब्रौटन नामक एका लष्करी अधिका-याने आपल्या पुस्तकांत असे लिहिले आहे की, सर्जेरावांचा भयंकर रीतीने खून झाल्याचे वृत्त बायजाबाईस ज्या वेळीं समजले, त्या वेळी त्या दुःखसागरात बुडून गेल्या. त्या प्रसंगी खुद्द दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांचे सांत्वन केले त्यांचे अश्रु स्वतः आपल्या हातांनीं पुशिले. ह्यावरून त्यांच्या पतिप्रेमाची कल्पना करितां येईल. अर्थात् अशा प्रियकर पतीचा वियोग झाल्यामुळे बायजाबाईसाहेबांस आजन्म दुःख व्हावें हें साहजिक आहे. त्यांनी हिंदुस्थानांतील साध्वी सुशील स्त्रियांप्रमाणे आपल्या पतीच्या पश्चात् आपले सौभाग्यालंकार सर्व राजविलास सोडून दिले होते, आणि राज्याधिकाराची परिसमाप्ति झाल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष्य पारमार्थिक कृत्यांत घातले होते. त्या फक्त साधीं वस्त्र परिधान करीत असत; आणि जमिनीवर निजत असत. मिसेस फेनी पास ह्या बाईने ह्या गोष्टीचादेखील उल्लेख आपल्या प्रवासवृत्तामध्ये केला आहे. ‘बायजाबाई ह्या अगदी साधे रेशमी वस्त्र नेसल्या होत्या. त्यांच्या हातांत सोन्याच्या साध्या पाटल्या भात्र होत्या. त्याशिवाय त्यांच्या अंगावर एकही। अलंकार नव्हता. वैधव्यदशा प्राप्त झाल्यापासून त्यांनी रत्नालंकारांस स्पर्श केला नाही. त्यांनी अनेक नेमधर्म उपासतापास स्वीकारिले होते. त्या सदोदित जमिनीवर निजत असत. त्यामुळे त्यांस संधिवाताची विकृति झाली. तेव्हापासून त्यांच्या अंगाखालीं जाड्याभरड्या कापडाची गादी असे. परंतु त्या कधीही पलंगावर निजल्या नाहींत. ११८ . स्वभाव. *** सर्जेराव घाटगे यांचा स्वभाव क्रूर तामसी असल्यामुळे त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या कन्येचा स्वभाव असेल, असे समजून पुष्कळ लोक बायजाबाईस क्रूर जुलमी राजस्त्रियांच्या मालिकेत गोंवितात. परंतु वास्तविक त्यांचा स्वभाव तशा प्रकारचा नव्हता. त्यामानोहि महतां धनम्' ह्या कोटींतल्या असल्यामुळे फार मानी पाणीदार होत्या. त्यामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये थोडासा तापटपणा आला होता. त्याचप्रमाणे त्यांची कदर प्रखर असल्यामुळे त्या विशेष करारी दृढनिश्चयी अशा भासत होत्या. परंतु सर्जेरावांचे दुर्गुण त्यांचे अंगांत वसत होते असे दिसत नाहीं. मिल्लसाहेबांनी बायजाबाईच्या राज्यकारभाराविषयी लिहितांना, ती स्वभावाने कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती. ह्मणून त्यांच्या स्वभावाचे जे वर्णन केले आहे, तेच खरे आहे. त्यांना मानहानि किंवा उपमर्द सहन होत नसे. त्याबद्दल मात्र त्या कडक शिक्षा देत असत. परंतु, विनाकारण अनाथाचा छल करणे, किंवा अन्यायाने प्रजेस पीडा देणे, वगैरे प्रकार त्यांचे हातून कधी घडल्याचे 07. आढळून येत नाहीं. एवढेच नव्हे, तर प्रजेस सुख देण्याविषयीं -गरीब लोकांवर उपकार करण्याविषयीं त्या सदोदित दक्ष असत. |

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...