"#असे_होते_स्वराज्य"...
स्वराज्यविस्तार-
"सालेरी किल्ल्यापासून गोदावरी नदीअलीकडे कुलदेश वरघाट,तळपावेतो एक प्रांत व तुंगभद्रेपलीकडेदेखील कोल्हार,बाळापूर,चंदी,येलूर ,सदरकावेरीपावेतो ऐसा एक प्रांत असे दोन प्रांत मिळून एक येक राज्य."
यातील पहिला प्रांत म्हणजे नाशिक,सातारा,कोल्हापूर,पुण े,रायगड,ठाणे,रत्नागिरी हा प्रदेश होय.
तुंगभद्रा आणि कावेरी च्या मधला प्रदेश म्हणजे चंदीचा हादुसरा प्रांत,मिळून स्वराज्य.
स्वराज्याचे उत्पन्न -
"स्वामी धाकुटे होते तेव्हा येक लाखाचा महाल होता तेचे आता सवा क्रोडचा मुलुख झाला"
१६४८ साली पुणे महालाची शिवाजी महाराजांची जहागीर होती जिचे उत्पन्न १ लाख होते, राज्याभिषेकापर्यंत म्हणजे १६७४ पर्यंत त्याचे रुपांतर सव्वा कोटींच्या भव्य मुलुखात झाले.
शिवरायांचे स्वप्न "अहद तंजावर तहद पेशावर" असे होते जे नंतर च्या काळात अटकेपार झेंडे लावल्याने पूर्ण झाले.
स्वराज्याची लोकसंख्या -
पूर्वीच्या काळी सैन्यावरून एकूण लोकसंख्या मोजावयाची पद्धत होती, मोरमेड या संशोधकाच्या सिद्धांतानुसार स्वराज्याची लोकसंख्या ६२ लक्ष असावी.
राज्यव्यवस्था आणि शेती -
राज्यातील सर्व प्रजा शेतीप्रधान होती त्यांच्यासाठी शिवाजी महाराज म्हणतात-
"ज्याला शेत करावयास कुवत आहे आणि त्याला जोतास बैल,नांगर,पोटासदाणा नाही; त्याविन आडोन तो निकामी झाला असेल, तरी त्याला दो चौ बैल घेण्यास पिके द्यावे,बैल घेवावे"
कुठे शेतकऱ्याला स्वताच्या मुलाप्रमाणे जपणारे छत्रपती आणि कुठे आताचे सरकार...काही तुलनाच नाही.
अधिकारी आणि प्रजा -
शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकार्यांना प्रजेशी कसे वागावे याचीसक्त ताकीद दिलेली दिसते.
"विलातीस (प्रजेस) तसवीस देऊ लागाल, ऐशास लोक जातील, कोणी कुणब्याचे (शेतकर्याचे ) दाणे आणील, कोन्ही भाकर,कोन्ही गवत, कोन्ही फाटे, कोन्ही भाजी, कोनी पाले. ऐसे करू लागले म्हणजे कुणबी घर सोडून जातील, उपाशी मराया लागतील. म्हणजे असे होईल कि मोगली मुलकात आहे त्याहून अधिक झाले तुम्ही ! ऐसा तळतळाट होईल "
ग्रामव्यवस्था -
शिवकालीन व्यवस्था १२ बलुतेदारांची होती. त्याप्रमाणे त्यांची कामे नेमून दिले आहेत.
बलुतेदारांना राज्यात राहण्याबद्दल शिवराय म्हणतात, "वतनी राहणे हेही थोर काम आहे. एकाने सिध्द संरक्षण करावे एकाने साध्य करावे, दोन्ही कामे साहेब बराबरीने मानताती"
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
स्वराज्यविस्तार-
"सालेरी किल्ल्यापासून गोदावरी नदीअलीकडे कुलदेश वरघाट,तळपावेतो एक प्रांत व तुंगभद्रेपलीकडेदेखील कोल्हार,बाळापूर,चंदी,येलूर
यातील पहिला प्रांत म्हणजे नाशिक,सातारा,कोल्हापूर,पुण
तुंगभद्रा आणि कावेरी च्या मधला प्रदेश म्हणजे चंदीचा हादुसरा प्रांत,मिळून स्वराज्य.
स्वराज्याचे उत्पन्न -
"स्वामी धाकुटे होते तेव्हा येक लाखाचा महाल होता तेचे आता सवा क्रोडचा मुलुख झाला"
१६४८ साली पुणे महालाची शिवाजी महाराजांची जहागीर होती जिचे उत्पन्न १ लाख होते, राज्याभिषेकापर्यंत म्हणजे १६७४ पर्यंत त्याचे रुपांतर सव्वा कोटींच्या भव्य मुलुखात झाले.
शिवरायांचे स्वप्न "अहद तंजावर तहद पेशावर" असे होते जे नंतर च्या काळात अटकेपार झेंडे लावल्याने पूर्ण झाले.
स्वराज्याची लोकसंख्या -
पूर्वीच्या काळी सैन्यावरून एकूण लोकसंख्या मोजावयाची पद्धत होती, मोरमेड या संशोधकाच्या सिद्धांतानुसार स्वराज्याची लोकसंख्या ६२ लक्ष असावी.
राज्यव्यवस्था आणि शेती -
राज्यातील सर्व प्रजा शेतीप्रधान होती त्यांच्यासाठी शिवाजी महाराज म्हणतात-
"ज्याला शेत करावयास कुवत आहे आणि त्याला जोतास बैल,नांगर,पोटासदाणा नाही; त्याविन आडोन तो निकामी झाला असेल, तरी त्याला दो चौ बैल घेण्यास पिके द्यावे,बैल घेवावे"
कुठे शेतकऱ्याला स्वताच्या मुलाप्रमाणे जपणारे छत्रपती आणि कुठे आताचे सरकार...काही तुलनाच नाही.
अधिकारी आणि प्रजा -
शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकार्यांना प्रजेशी कसे वागावे याचीसक्त ताकीद दिलेली दिसते.
"विलातीस (प्रजेस) तसवीस देऊ लागाल, ऐशास लोक जातील, कोणी कुणब्याचे (शेतकर्याचे ) दाणे आणील, कोन्ही भाकर,कोन्ही गवत, कोन्ही फाटे, कोन्ही भाजी, कोनी पाले. ऐसे करू लागले म्हणजे कुणबी घर सोडून जातील, उपाशी मराया लागतील. म्हणजे असे होईल कि मोगली मुलकात आहे त्याहून अधिक झाले तुम्ही ! ऐसा तळतळाट होईल "
ग्रामव्यवस्था -
शिवकालीन व्यवस्था १२ बलुतेदारांची होती. त्याप्रमाणे त्यांची कामे नेमून दिले आहेत.
बलुतेदारांना राज्यात राहण्याबद्दल शिवराय म्हणतात, "वतनी राहणे हेही थोर काम आहे. एकाने सिध्द संरक्षण करावे एकाने साध्य करावे, दोन्ही कामे साहेब बराबरीने मानताती"
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:
Post a Comment