नायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा
-महावीर सांगलीकर
भाग १
कर्नाटकच्या इतिहासात अनेक महापराक्रमी राजे आणि राण्या होवून गेल्या. त्यांचे पराक्रम वाचले की आपण थक्क होतो.
कर्नाटकात चेन्नम्मा नावाच्या दोन राण्या होवून गेल्या. त्यापैकी पहिली केळदी चेन्नम्मा या नावाने तर दुसरी कित्तूर चेन्नम्मा या नावाने ओळखली जाते. केळदी चेन्नम्मा ही किनारी कर्नाटकाच्या केळदी या राज्याची राणी होती, तर कित्तूर चेन्नम्मा ही उत्तर कर्नाटकातील कित्तूर या राज्याची राणी होती.

केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना इ.स. 1499 साली झाली होती. हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी चेन्नम्माचे लग्न झाले.(इ.स. 1667). सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. 1677 मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला.
या राणीला मूलबाळ नव्हते, त्यामुळे तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.
या राणीला मूलबाळ नव्हते, त्यामुळे तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.

No comments:
Post a Comment