विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

हिंदनृपती छत्रपती शाहूमहाराजांचे दुर्मिळ चित्र.

हिंदनृपती छत्रपती शाहूमहाराजांचे दुर्मिळ चित्र.
छत्रपती थोरले शाहूमहाराजांच्या आणखी एका दुर्मिळ छायाचित्राची माहीती देत आहे :

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतार करणार्या त्यांच्या नातवाचा अर्थात हिंदनृपती छत्रपती थोरले शाहूमहाराज यांचा काळ असो, वा ब्रिटीश शासनाला न जुमाणार्या बाणेदार प्रतापसिंह महाराज(पहिले) यांचा काळ असो या दोन्ही कालखंडात अत्यंत निष्ठा राखलेल्या सातार्याच्या बाळाजी शिंपी(ढवळे) यांच्या वंशजांनी छत्रपती थोरल्या शाहूमहाराजांच्या स्मृती एका दुर्मिळ चित्राच्या माध्यमातून तब्बल २५०-२८० वर्षे जतन करून ठेवल्या आहेत.
साडेपाच बाय सव्वा आठ इंच आकाराचे हे पुर्ण उन्नत मराठा शैलीतील चित्र छत्रपती थोरले शाहूमहारांच्या तरूणपणातील आहे. राजवाड्यातील एका दालनात एका निवांत क्षणी बैठ्या तख्तावर बसलेले छत्रपती थोरले शाहूमहाराज रेखाटताना त्या अज्ञात चित्रकाराने खुपसे बारकावे टिपले आहेत. शाहूमहाराजांचे मानेपर्यंत रूळणारे काळे केस, आजोबा शिवछत्रपतींसारखे गरूड नाक, वडील छ. संभाजीराजेंसारखी भेदक नजर ही छत्रपती घरण्याची खास वैशिष्ट्ये चित्रकाराने या चित्रात पुरेपुरे उतरवली आहेत.
या चित्रात प्रामुख्याने विटकरी, गुलाबी, हिरवा, पिवळा व सोनेरी रंगाचा वापर करण्यात आला आहे. यातील सोनेरी रंगाचे वैशिष्ट्य असे की, हा रंग अस्सल सोन्यापासून तयार केलेला सोन्याचा वर्ख आहे. चित्रातील गादी, तीन लोडांवरील नक्षी, कानातील कर्णफुले, महाराजांनी घातलेल्या हिरव्या रंगातील पायघोळावरील फुलांची नक्षी,महाराजांना वारा घालणार्या नोकराच्या कानातील कर्णफुले, हातातील तोडे, पंख्यावरील फुलांची नक्षी यासाठी वापरलेला सोन्याचा वर्ख आजही आहे तसाच आहे.
हे दुर्मिळ चित्र देशप्रेमाचा प्रदिर्घ इतिहास लाभलेल्या व छत्रपती घरण्याशी अढळ निष्ठा असलेल्या ढवळे घराण्यातील शशिकांत भालचंद्र ढवळे यांनी अत्यंत प्राणपणे जपले आहे.
#हिंदनृपती.
#शाहूशाही.
#शाहूपर्व.

माहीती साभार : Gurudas Adagale व तरूण भारत,सातारा.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...