!!!! नमन माझे पिरंगुटच्या जगदिश्वराला
तुळजापूरच्या तुळजाभवानीला
भगव्या जरीपटक्याला
छत्रपती शिवाजीराजांना ,धर्मवीर शंभूराजांना
राजाराम शाहू महाराजांना
सरनौबत पिलाजी गोळे यांच्या
ऐका पराक्रमाला ... जी ....जी....
१० जून १६४० ला गोळे घराण्याला
नरवीर जन्मला
पिलाजी ठेवलं नावाला
कुस्तीची आवड पठ्ठयाला
दांडपट्टा ,भालाफेक आवड जोडीला
बलदंड शरीरयष्ठीला
शोभे तलवार कमरेला ढाल पाठीला जी ...जी...
स्वराज्याच्या सेवेला
आणभाक घेऊन ईमानाला
महाराजांनी सरनौबत केलं पायदळाला
पराक्रम गाजवी युद्ध समयाला जी...जी...
औरंगजेबाने कपटानं हत्या
केली शंभूराजांची...
घालमेल झाली
छत्रपती राजारामांची...
झुल्फिकारखान आला चालून
रायगड कसा वाचवावा शत्रूपासून जी...जी...
पिंरगुटला निरोप धाडला..
पिलाजी पावते झाले समयाला...
सहाय्य करण्या राजारामराजाला...
एक हजार मावळा सोबतीला..
राजाराम ताराराणी वाघ दरवाजातून
आले रायगड सोडून...
रायगड ते प्रतापगड अंतर
घनदाट जंगल चौफेर
राजाला आणलं प्रतापगडावर ....जी...जी...
मोठा फौजफाटा घेऊन काकरखान आला चालून
पिलाजी गोळे नरवीर
सोबत घेऊन पराक्रमी सरदार
रणसंग्राम पेटला घनघोर
नरवीरांची तळपली समशेर
शेकडो मोघल केले क्षणात ठार
काकरखानानं मानली हार...
जी...जी..
आनंदला राजाराजाराम
पाहून पिलाजीचा पराक्रम
५६ गावं दिली इनाम
सरनौबत केलं पायदळाला
पराक्रमाचा बहुमान केला जी...जी...
धन्य धन्य पिलाजी नरवीर
शौर्याची खाण ,पराक्रमी शूरवीर
सळसळत्या रक्ताचा अंगार
एकनिष्ठा स्वराज्याच्या पिढीला
मुजरा करतो तुम्हा स्वाभिमानाला....जी..जी...
@ हिंदुराव गोळे
No comments:
Post a Comment