विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

३० जून १६९३ “शूर सरदार नावाजी बलकवडे” किल्ले सिंहगड....🚩

३० जून १६९३ “शूर सरदार नावाजी बलकवडे” किल्ले सिंहगड....🚩
.
भोरच्या सचिवांच्या पदरचा एक पराक्रमी मराठा सरदार राजाराम महाराज जिंजीस असताना महाराष्ट्रातील किल्ले आणि प्रदेश पुन्हा काबिज करण्याचा मोठाच उद्योग मराठे विरांना हाती घ्यावा लागला सचिवांच्या आज्ञेने नावाजींनी सिंहगड जिंकला पूर्वी सुभेदार तानाजी मालुसरेंनी जसा धाडसी हल्ला केला होता अगदी त्याच पद्धतीने सिंहगड जिंकला स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर ते कोकणातील पाली सुधागड परिसराचा सुभेदार झाले...
.
मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले अवघड मार्गानी खाचा खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले परंतु किल्ल्यवर मोगलांचे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते त्यमुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत सुर्योदय झाला.. तेंव्हा किल्ल्यावरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते...
.
पावसाळ्यातल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेवच्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला..
पोस्टसाभार
॥ शिवकालीन इतिहास ॥

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...