विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

निप्पाणी येथील सरलष्कर देसाई नाईक निंबाळकर यांची गढी












निप्पाणी येथील सरलष्कर देसाई नाईक निंबाळकर यांची गढी पुणे बंगलोर हाय वे लगत निपाणी हे गाव आहे,निपाणी कर्नाटक राज्याच्या हद्दीत मोडते,तर कोल्हापूर पासून 30 ते 40 की.मी अंतरावर निपाणी गाव आहे, या निपाणी गावात नाईक निंबाळकर हे संस्थानिक आहेत यांची या ठिकाणी भव्य दिव्य गढी वजा भुईकोट किल्ला सुस्थित आहेत, मूळ नाईक निंबाळकर हे निंबळक येथील, श्रीमंत सिद्धोजोराव देसाई निपाणकर या शाखेचे मूळ पुरुष,निपाणकरांची भरभक्कम गढी पराक्रमची साक्ष घेऊन मोठ्या दिमाखात खडी आहे,गढीचे प्रवेश द्वार भल भक्कम आहे,वाड्यात एकूण चार चौक आहेत,आतील बाजूस सागवानी लाकडात चांगल्या स्थितीत वाडा पहावयास मिळतो,वाड्यात पाण्याच्या सोयी साठी मोठे बारव आहेत,वाड्यात पाहण्यासारखे आणखी काही वास्तुरंग वेळे अभावी राहून गेले वाड्या बद्दल माहिती व त्याचे दर्शन निपाणकरांचे वंशज दादाराजे निपाणकर देसाई यांनी करवून दिले!

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...