विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 July 2020

#बांदल_सेना_शौर्य_दिन.



#बांदल_सेना_शौर्य_दिन.
◆॥ सरदार बाजी बांदल व बंधु फूलाजी बांदल तसेच बाजीप्रभु देशपांडे आणि शंभूसिंग जाधवराव बलिदान दिवस ॥◆

"छत्रपती शिवराय" पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले असताना वाटेत गजापूरच्या खिंडीत भयंकर रणसंग्राम घडला.
"हिरडस मावळ" मधील "बाजी बांदल व बंधू फुलाजी तसेच रायाजी बांदल" हे शिवरायांसोबत ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि रायाजी बांदल यांचे पिता "बाजी बांदल" व फुलाजी बांदल हे ३०० मावळे घेऊन स्वता खिंडीत गनिमीला रोखण्यासाठी सज्ज झाले.
सिद्दी मसूद आणि त्याची फौज खिंडीत आली व सर्वत्र एकच कापाकापी सुरू झाली.
या रणसंग्रामात "बाजी बांदल" व "फुलाजी बांदल" आणि त्यांचे साथीदार धारातिर्थी पडले. गजापूरची खिंड पावन झाली. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे सुद्धा होते.
ते "बांदल" याच्याकडे कारकून म्हणून काम करत असत.

या युद्धात धारातिर्थी पडलेल्या बाजी बांदल आणि त्यांच्या पराक्रमी सेनेचा स्वता छत्रपती शिवरायांनी "बांदल सेना" असा उल्लेख केला होता.
पुढे महीन्याभरात स्वता छत्रपती शिवराय हे भोर तालुक्यातील "पिसावरे" या "बांदल" यांच्या गावी जाऊन "बाजी बांदल" यांच्या मातोश्री "दिपाऊ बांदल" यांचं सांत्वन केले.
तसेच "बाजी बांदल" यांचे पुत्र "रायाजी बांदल" यांना स्वराज्यातील मानाचं पहिल पान (मानाची तलवार) देऊन त्यांना सरदारकी दिली.
३०० बांदलसेनेसह शंभुसिंह जाधवराव उर्फ संभाजी जाधव (सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील व लखोजी जाधवराव यांचे वंशज),
सरदार बाजी बांदल-फुलाजी बांदल व बाजीप्रभु देशपांडे तसेच ३०० बांदल मावळे यांच्या रक्ताने पावन झालेली "पावनखिंड".
सर्वांनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली.
ही घटना रात्री १२ जुलै ते १३ जुलै १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.

घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

●॥ १३ जुलै १६६० संपूर्ण बांदलसेना बलिदान दिन या अश्या शुरवीर योद्ध्यांना त्रिवार मानाचा मुजरा ॥●

- गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...