संताजी घोरपडे यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य याचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता याबद्दल मोगल इतिहासकार खाफिखान लिहतो की " समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत "
आपल्या युद्धनितीने मोगलांना सळो की पळू करून सोडणारे मराठा सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा ...
No comments:
Post a Comment