वैभवशाली मौर्य साम्राज्याचा इतिहास.
धनानंदाचे साम्राज्य उलथवून टाकणाऱ्या चंद्रगुप्त मौर्यापासून आपल्याला मौर्य घराण्याचा इतिहास पहायला मिळतो.
अलेक्झांडरच्या नंतर 'बाबिलोन' येथील गादीवर अलेक्झांडरचा 'सेल्यूकस निकेटर' Seleucus I Nicator नावाचा सेनापती सीरीयाचा राजा म्हणून स्थानापन्न झाला.
(ऐतिहासिक मेसोपोटेमियन साम्राज्याचे बाबिलोन Babylon हे राजधानीचे शहर होते. आज हे शहर इराक मध्ये येते. बगदादपासून साधारण ९४ किलोमीटरवर अंतरावर हे शहर आहे.)
सेल्यूकस निकेटरने मौर्य साम्राज्याच्या हद्दीत असलेल्या पंजाबवर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला आणि त्याचे परोपनिषाद म्हणजे काबूल, आराचोषिया म्हणजे कंदाहार, गेड्रॉशिया म्हणजे बलोचिस्तान, आणि हिरात हे प्रांत हिसकावून घेतले व त्याची एक मुलगी आपली राणी केली.
हीच नाव हेलन किंवा हेलेना. हिच्या नावाविषयी इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. पण हि कजाग बाई होती. हिनेच चंद्रगुप्ताच्या अंगरक्षकांत यवन (ग्रीक) जातीच्या धिप्पाड व सशस्त्र धनुर्धारी स्रियांचा समावेश केला होता.
हीच नाव हेलन किंवा हेलेना. हिच्या नावाविषयी इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. पण हि कजाग बाई होती. हिनेच चंद्रगुप्ताच्या अंगरक्षकांत यवन (ग्रीक) जातीच्या धिप्पाड व सशस्त्र धनुर्धारी स्रियांचा समावेश केला होता.
(१९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी अगोदर पंजाब हा फार मोठा प्रांत होता. जसा आपल्याकडे पंजाब आहे तसाच पाकिस्तानकडेही पंजाब आहे.
महत्वाचे: भारतापेक्षा मोठा पंजाब पाकिस्तानकडे आहे.
पाकिस्तानचा पंजाब प्रांत 205,344 स्क्वेअर किलोमीटर आहे तर भारताचा पंजाब 50,362 स्क्वेअर किलोमीटर आहे. शिखांची मूळ राजधानी लाहोर होती. शिखांचा राजा रणजित सिंह लाहोरवरूनच राज्य करत होता.
Google वर Punjab old map असे सर्च केले कि तुम्हाला मूळ पंजाब किती मोठा होता हे लक्षात येईल.)
महत्वाचे: भारतापेक्षा मोठा पंजाब पाकिस्तानकडे आहे.
पाकिस्तानचा पंजाब प्रांत 205,344 स्क्वेअर किलोमीटर आहे तर भारताचा पंजाब 50,362 स्क्वेअर किलोमीटर आहे. शिखांची मूळ राजधानी लाहोर होती. शिखांचा राजा रणजित सिंह लाहोरवरूनच राज्य करत होता.
Google वर Punjab old map असे सर्च केले कि तुम्हाला मूळ पंजाब किती मोठा होता हे लक्षात येईल.)
सेल्यूकस निकेटरने आपला मगॅस्थेनिस (Megasthenes) नावाचा एक वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला होता. मगॅस्थेनिसने तत्कालीन परिस्थितीची Indika (Greek: Ἰνδικά) नावाची एक बखर लिहिली होती. सांप्रत ती संपूर्ण उपलब्ध नाही. मात्र तिच्यातून पुढील अनेक लेखकांनी घेतलेले पुष्कळसे उतारे तूर्त आपल्यास आढळून येतात. ह्या माहितीवरून मौर्य साम्राज्याच्या वेळेसची बरीच माहिती उजेडात येते.
चंद्रगुप्ताने २४ वर्षे साम्राज्याचा उपभोग घेतला. चंद्रगुप्ताच्या साम्राज्यात अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, काठेवाड व थोडासा बंगाल या प्रांताचा समावेश झाला होता. म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील सर्व हिंदुस्थानचा तो सम्राट होता.
जैन कथेवरून दख्खनमध्ये म्हैसूरपर्यंत त्याचे राज्य पसरले होते असेही म्हणतात.
जैन कथा म्हणते की; चंद्रगुप्त हा राज्य करत असताना जैनसंत भद्रबाहु हा त्याच्या राज्यात राहत होता. चंद्रगुप्ताच्या राज्याच्या शेवटी शेवटी १२ वर्षांचा दुष्काळ उत्तर हिंदुस्थानात पडल्यामुळे जैन संत भद्रबाहु हा आपल्या १२ हजार जैन शिष्यांसह कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथे राहण्यास आला व चंद्रगुप्ताने आपल्या मुलास गादीवर बसवून तोहि या जैन मंडळीबरोबर श्रवणबेळगोळ येथे आला.
येथे १२ वर्षे कडक तप करून व जैन मताप्रमाणे निसहार राहून चंद्रगुप्ताने चाणक्याबरोबर वानप्रस्थाश्रम स्वीकारला असावा असेही काही इतिहासकारांचे मत आहे. कारण वानप्रस्थाश्रम ही रीत त्यावेळी प्रचलित होती.
येथे १२ वर्षे कडक तप करून व जैन मताप्रमाणे निसहार राहून चंद्रगुप्ताने चाणक्याबरोबर वानप्रस्थाश्रम स्वीकारला असावा असेही काही इतिहासकारांचे मत आहे. कारण वानप्रस्थाश्रम ही रीत त्यावेळी प्रचलित होती.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
चंद्रगुप्तानंतर बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र ख्रि. पू. २९८ च्या सुमारास मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसला.
बिंदुसार हा फार शूर असल्याने व याने दख्खनमधील पुष्कळ प्रांत आपल्या साम्राज्यास जोडल्याने याला अमित्रघात म्हणजे शत्रूंचा घात करणारा हे बिरुद मिळाले.
ह्या बिंदूसारची माहिती फारशी आढळत नाही.
बिंदुसार हा फार शूर असल्याने व याने दख्खनमधील पुष्कळ प्रांत आपल्या साम्राज्यास जोडल्याने याला अमित्रघात म्हणजे शत्रूंचा घात करणारा हे बिरुद मिळाले.
ह्या बिंदूसारची माहिती फारशी आढळत नाही.
मेग्यास्थेनीसच्या नंतर दैमाकोस Deimachus हा बिन्दुसारच्या दरबारात राजदूत म्हणून होता.
ईजिप्तच्या टालेमी फिलाडेल्फस Ptolemy II Philadelphus या राजानेहि आपला राजदूत बिन्दुसारच्या दरबारात ठेवला होता.
बिंदुसार नंतर त्याचा पुत्र अशोकवर्धन उर्फ अशोक हा मगधाधीश झाला. त्याला अनेक भाऊबहिणी असून एक सुसीम नावाचा वडील भाऊहि होता. परंतु बिंदुसारने अशोकालाच मगधाचा उत्तराधिकारी ठरविले.
अशोकाने ४० वर्षें अत्यंत उत्तम रीतीने राज्य केले. तो पाटलीपुत्र येथे मरण पावला असे म्हणतात. त्याला बरीच मुले होती. त्यापैकी जलुक हा सनातनधर्मी असून त्याने अशोकाच्या पश्चात काश्मीरकडे स्वतंत्र राज्य स्थापन केले. अशोकाचा नातू दशरथ हा अशोकाच्या मागून मगधाच्या गादीवर बसला व दुसरा नातू संप्रति हा उज्जनी येथे स्वतंत्र राजा बनला. याने जैन धर्मास फार उत्तेजन दिले. यापुढील मौर्य राजांची हकीकत स्पष्ट समजत नाही. त्यांच्यातील शेवटचा राजा बृहद्रथ याला त्याचा सेनापति पुष्यमित्र शुग याने ठार मारून गादी बळकाविली.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मौर्य साम्राज्याची राज्यव्यवस्था
मौर्य साम्राज्याची राज्यव्यवस्था हि त्या वेळेस जगातील सर्वोत्तम राज्यव्यवस्था होती.
मौर्य साम्राज्याची राज्यव्यवस्था हि त्या वेळेस जगातील सर्वोत्तम राज्यव्यवस्था होती.
चंद्रगुप्त व बिंदुसार यांच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप कौटिलीय अर्थशास्त्रावरून उत्कृष्ट रीतीने दिसून येते. हे मौर्य साम्राज्य मोठे सु-संरक्षित, फार श्रीमंत, अतिशय सैन्य असलेले, राज्यकारभारीची निरनिराळी खाती पडलेले, त्या त्या खात्यांत निरनिराळ्या दर्जाचे अधिकारी (सिव्हिल सर्व्हिस) नेमलेले असे होते.
भारतीय विद्यांचा अभ्यासक आणि इतिहासकार व्हिन्सेंट आर्थर स्मिथ (Vincent Arthur Smith ) मौर्यांच्या साम्राजाची महती सांगताना म्हणतो कि; "१६५६ साली मुघल सल्तनतीचा बादशाह झालेल्या अकबराचा राज्यकारभार हा १८०० वर्षांपूर्वीच्या मौर्य साम्राज्याच्या राज्यकारभाराच्या लायकीसही उभा राहू शकत नव्हता इतका दळभद्री होता.
अकबराच्या राज्यापेक्षा मौर्य साम्राज्याचा राज्यकारभार जास्त सुसंघटित व सुनियंत्रित होता. अकबराचा कारभार लष्करी पायावरच चाललेला होता, अकबराच्या खास मुदबकखान्यांतील लहानमोठे अधिकारीहि लष्करी सरंजामदार होते. अकबराच्या लष्करांत सरंजामी फौज जास्त असून सरकारी खडे सैन्य थोडे होते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या कवायती पलटणांपुढे अकबराच्या लाग चालत नसे.
उलट १८०० वर्षांपूर्वीच्या मौर्य साम्राज्याची मुलकी व लष्करी खाती भिन्न भिन्न असून, लष्कर हे आजच्याप्रमाणे सर्वस्वी सरकारच्या हुकमतीखाली होते. त्यामुळेच चंद्रगुप्ताने सेल्युकसला पिटाळून लावले. शिवाय मौर्यासाम्राज्यातील हेरखाते हे अकबराच्या हेर खात्यापेक्षा फार श्रेष्ठ दर्जाचे असून हेर खात्यामुळे व एकंदर शिस्तीमुळे सरकारचा दाब साम्राज्यांतील निरनिराळ्या व दूरदूरच्या अधिकार्यांवर कडकपणे बसला होता.
म्हणून अकबराच्या साम्राज्यापेक्षाहि मौर्यसाम्राज्य विस्तृत असून ते अतिशय सुनियंत्रित व कार्यकुशल होते. त्यांत चंद्रगुप्त, बिंदुसार व अशोक या तीन पिढ्याहि कर्तृत्वान व दक्ष अशा सम्राटांच्या होऊन गेल्या. त्यामुळे तर मौर्य साम्राज्याला जास्त स्थिरता आली."
चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र ही शोणनदीच्या उत्तरथडीस असून ती एक कोस रुंद व साडेचार कोस लांब होती आणि तिच्यातच प्राचीन कुसुमपुर ही राजधानी लुप्त होऊन गेली होती.
(१ कोस म्हणजे साधारण ३ किलोमीटर)
(१ कोस म्हणजे साधारण ३ किलोमीटर)
शोण व गंगा यांच्या संगमाच्या प्रचंड चिमट्यांत राजधानी पाटलीपुत्र बसविल्यामुळे शत्रूंस जिंकण्यास दुष्प्राप्य होती. तिच्याभोवती लाकडी तट असून, त्याला ५७० बुरूज व ६४ वेशी होत्या आणि तटाभोवती शोण नदीच्या पाण्याने भरलेला खोल व रुंद असा खंदक होता.
मुख्य राजवाडा बहुधा सांप्रतच्या कुम्हरार (Kumhrar, Patna, Bihar) खेड्याच्या गावठाणावर असावा. मुख्यतः लाकडी बांधणीचा असून त्याच्या खांबांना सोन्याचे पाणी दिले होते व त्यावर सोनेरी आणि रुपेरी नकशीकाम केले होते. राजवाड्याभोवती एक मोठे व सुंदर उद्यान असून त्यात अनेक तलाव आणि नाना प्रकारची झाडे व वनस्पती लावलेल्या होत्या.
ग्रीक लेखक म्हणतात की चंद्रगुप्ताचा राजवाडा तर इराणमधील शूस Shush व एकबतन Ekbatan येथील राजवाड्यापेक्षाहि फार मौल्यवान होता.
राजवाडयांत ६।६ फूट उंचीची सोन्याची भांडी पुष्कळ होती. सम्राट हा सोन्याच्या पालखीतून अथवा हत्तीवरील सोन्याच्या अंबारीतून हिंडत असे. त्याचे कपडे निळ्या रंगाच्या भरजरी मलमलीचे असत. सर्व आशियाखंडातील मौल्यवान वस्तू त्याच्या राजवाडयांत आढळत.
त्याच्या अंगरक्षकांत यवन (ग्रीक) जातीच्या धिप्पाड व सशस्त्र धनुर्धारी स्त्रिया असत.
(ग्रीकांना उद्देशून आपल्याकडे यवन शब्द वापरतात. )
(ग्रीकांना उद्देशून आपल्याकडे यवन शब्द वापरतात. )
**
यवन शब्द नीट समूज घ्या. हा फार महत्वाचा शब्द आहे. आपल्याकडे ह्या शब्दाला फार पूर्वीपासून वापरतात.
Yavana: The commonly accepted definition states that the term 'Yavana' originally had meant 'Greek' and that it was only later that it was applied to Romans, Arabs, and westerners in general.
यवन शब्द नीट समूज घ्या. हा फार महत्वाचा शब्द आहे. आपल्याकडे ह्या शब्दाला फार पूर्वीपासून वापरतात.
Yavana: The commonly accepted definition states that the term 'Yavana' originally had meant 'Greek' and that it was only later that it was applied to Romans, Arabs, and westerners in general.
'Yavana' is generally thought to be derived from the trek word 'Iawn/Iaones' (Ionian). It has ben suggested that the Indians took the word from some Semitic language or from the Persians when they first encountered Greeks on the borders of their country.
The Persians originally called Ionian Greeks and later all Greeks, Yaunas. The Hebrew word for Greeks is also 'Yawan'.
**
चंद्रगुप्ताचे अंतःपुर (जनानखाना) फार मोठे असे. चंद्रगुप्ताच्या मृगयेसाठी (म्हणजे शिकारीसाठी) राखीव जंगले असत, त्यांत दुसर्याने मृगया केल्यास त्यास शिक्षा होई.
चंद्रगुप्त शेवट शेवटपर्यंत शिकार करीत असे यावरून तो जैनधर्मी नसून सनातनधर्मी असावा असे दिसते. महत्वाचे म्हणजे अशोकानेहि बौध्दधर्मीय होण्यापूर्वी मृगया म्हणजे शिकार करणे सोडले नव्हते.
निरनिराळ्या प्रकारची माणसांची, पशूंची, व पक्ष्यांची द्वंद्वयुध्दें व एकाच जोखडीखाली बैल व घोडे जोडलेल्या रथांच्या शर्यती होत असत. दरबारांत नृत्यांगना असत व सम्राटासाठी फुलांच्या माळा करणे, त्याला पाणी अथवा विडे देणे, त्याला पोशाख घालणे, त्याच्यावर छत्रचामरे वारणे इत्यादि कामांस स्त्रिया असत. वेश्यांना सरकारांत कर भरावा लागे व गुप्त हेरांचे कामहि वेश्यांना करावे लागे.
वायव्येकडील प्रांतांत म्हणजे आजच्या अफगाणिस्थान इराणच्या बाजूस अशोकाच्या काळातील खरोष्ठीलिपीचा प्रसार, गव्हर्नरांना सत्रप (क्षत्रप) ही पदवी लावणे ह्या शिवाय अशोकाच्या अंकित लेखांचे स्वरूप पाहिले असता इराणी व हिंदू लोकांचे दळणवळण फार प्राचीन काळापासून चालू असल्याचे दिसते. आणि त्यामुळे काही इराणी दरबारी चालीरीती भारतातही आल्या होत्या.
मौर्यकाली राजा हा राज्याचा कुलमुखत्यार असे. राजद्रोह केल्यास कोणासही सूट मिळत नसे. अगदी ब्राह्मणांसही राजद्रोह केल्यास पाण्यांत बुडवून मारीत. राजाला कमीत कमी चार प्रधानांचे प्रधानमंडळ असे व बहुतांश वेळी राजाच्या सल्ल्याने प्रधान मंडळास वागावे लागे.
युद्धातील महत्वाचे चतुरंग दळही (रथदळ) मौर्य साम्राज्यात होते. ह्युएनत्संगाच्या वेळी मात्र हर्षाच्या सैन्यांत रथदळ नाहीसे झाले होते असे दिसते.
चतुरंग दळ मिळून नंदांचे सैन्य ३ लाख होते तर मौर्याचे ७ लाख होते व त्यासाठी स्वतंत्र लष्करी खाते असून त्यात पाच निरनिराळी पोटखाती होती.
लढाई हत्तीवर चिलखत असून, त्याच्या पाठीवर माहुताखेरीज तीन धनुर्धर असत; प्रत्येक घोडेस्वाराजवळ एक ढाल व दोन भाले असत; प्रत्येक प्याद्याजवळ खांद्यास वादीनें अडकविलेली सरळ व रुंद पात्याची तलवार असून शिवाय लहान भाला व धनुर्बाण असे.
अत्यंत महत्वाचे: घोडा, हत्ती व माणूस यांना चिलखते असत. जखमी सैनिकांच्या साठी वैद्यकीय खाते असून, लढाईत पिछाडीच्या बाजूस त्याचे काम चाले. ह्या वैद्यकीय खात्यात पुरुष व दायाहि असत.
चाणक्याने राज्यकारभारांत सामदामदंडभेद यांवर व विशेषतः भेदावर जास्त जोर दिला आहे त्यामुळेच त्याला कौटिल्य अथवा पौर्वात्य मॅकिएव्हेली म्हणतात.
मेग्यास्थेनीस म्हणतो की, पाटलीपुत्रासारख्या श्रीमंत राजधानीत जास्तीत जास्त ८० रु. च्यावर चोरी होत नसे, इतका राज्यांत कडक बंदोबस्त होता आणि त्यामुळे लोकहि सुखी होते.
अपराध्यांना शिक्षा कडकच देत. सरकारी अधिकार्यांनी प्रजेस विनाकारण त्रास दिल्यास अधिकाऱ्यांचे शीर कलम करण्यासारखी अत्यंत कडक शिक्षा होत असे. साम्राज्याचे मोठमोठे भाग पाडून त्यावर स्थानिक-सुभेदार (आजचे गव्हर्नर) नेमीत.
मोठमोठ्या शहरांच्या पेठा करून त्यांवर स्थानिक, गोप इत्यादि संरक्षक अधिकारी नेमीत. अगदी शेवटचा अधिकारी १० पासून ४० घरांवर देखरेख करणारा असे.
शहराच्या मुख्य कोतवालाला नागरक म्हणत. शहरांतील प्रत्येक स्त्रीपुरुषाची जात, गोत्र, नाव, धंदा व त्यांचा जमाखर्चही या सरकारी अधिकार्यांनां ठाऊक असे.
सारांश, इतकी सूक्ष्म खानेसुमारी ठेवल्यामुळे कर वगैरे बसविण्यास सरकारास सुलभ जाई. आरोग्य रक्षणाचे नियम कडकपणे पाळीत व आगीबद्दल विशेष खबरदारी घेत. पाटलीपुत्रास आजच्या सारख्या महानगरपालिका असून तिचा कारभार ३० सरकारनियुक्त अधिकार्यांकडे सोंपविला होता.
या ३० सरकारनियुक्त अधिकार्यांची ६ उपमंडळे असून त्यांच्याकडे औद्योगिक, परदेशियांचे संरक्षण, जनन-मरण नोंद, फुटकळ व घाऊक व्यापार, वजनमापे परीक्षण, आयात निर्गत, विक्रीवरील (१० वा हिस्सा) कर गोळा करणे, सार्वजनिक कामे, बाजार- देवळे- बंदरे यांची व्यवस्था इ. कामे सोपविली होती.
सारांश, ख्रि. पू. ३०० च्या सुमारास या महानगरपालिकांचे इतके व्यवस्थित स्वरूप होते ही फार आश्चर्याची गोष्ट होय. त्या वेळेसच्या ग्रीक महानगरपालिकाही इतक्या व्यवस्थित नव्हत्या आणि पुढे १८०० वर्षानंतरच्या अकबरास तर या महानगरपालिका संस्थेची माहितीहि नव्हती.
मजुरी भरपूर देणे, कारागिरांस उत्तेजन देणे, व्यापारावर सुसह्य जकात बसविणे, पाटबंधारे व्यवस्थित ठेवणे, खाण चालविणे इ. अनेक कामे सरकार स्वतः करीत असे. त्यासाठी ३० निरनिराळी खाती होती. म्हणजे अधिकार विभागणीचे तत्त्व या मौर्य साम्राज्यात प्रचलित होते.
सरकारी कामांत लांच खाणार्यास देहांताची शिक्षा ठेवली होती.
मौर्य साम्राज्याचे हेरखाते अत्यंत शक्तिशाली होते.
गुप्तलिपी, बातमीसाठी कबूतरे उपयोगांत आणणे, प्रत्येक सरकारी खात्यांत गुप्तहेर ठेवणे, सर्व प्रधानांवरही हेर ठेवणे हे प्रकार मौर्य साम्राज्यात चालू होते. शेतकर्यांचा जमीनीवर मालकी हक्क नसावा असे अर्थशास्त्राच्या उल्लेखावरून दिसते (अ.शा. २.१).
गुप्तलिपी, बातमीसाठी कबूतरे उपयोगांत आणणे, प्रत्येक सरकारी खात्यांत गुप्तहेर ठेवणे, सर्व प्रधानांवरही हेर ठेवणे हे प्रकार मौर्य साम्राज्यात चालू होते. शेतकर्यांचा जमीनीवर मालकी हक्क नसावा असे अर्थशास्त्राच्या उल्लेखावरून दिसते (अ.शा. २.१).
शेतसारा बहुधा उत्पन्नाच्या एकचतुर्थांश असे (अकबर एक तृतीयांश घेई). मोठं मोठे रस्ते असून दर एक मैलावर हल्लीप्रमाणे अंतर लिहिलेले दगड पुरलेले असत. तक्षशिला-पाटलीपुत्र हा मोठा राजमार्ग असून खेरीज, इतर सरकारी रस्ते पुष्कळ होते.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मौर्य साम्राज्यात मौर्यांचे आरमाराची अत्यंत बलशाली होते.
मौर्य साम्राज्यातील लोकांत जहाजे बांधणार्यांचा स्वतंत्र वर्ग असून, तो सरकारी नोकरीत असे असे मेग्यास्थिनीसने लिहिले आहे.
सिंहलद्वीपाच्या (श्रीलंका) वर्णनांत प्लीनीने असे म्हंटले आहे की; हिंदुस्थान व लंका यामधील समुद्रांत चालणारी जहाजे विशिष्ट प्रकारची बांधलेली असत. खलाशी तार्यांकडे पाहून आपला मार्ग काढीत नसून जवळ पक्षी बाळगीत व ते मधून मधून सोडून देऊन त्यांच्या गत्यनुरोधाने जमीनीची दिशा ठरवीत.
सम्राट चंद्रगुप्ताच्या युद्धखात्यातील सहा मंडळांपैकी एक आरमारी मंडळ असून, त्याचे अस्तित्व व सुव्यवस्था ही राष्ट्रांत नौकानयानाची किती वाढ झाली होती हे दर्शवितात.
या आरमारी मंडळाबद्दल व आरमारी खात्याबद्दल माहिती समजण्यास आपणांस केवळ मेग्यास्थिनीस याच्या सारख्या परकीयांवर अवलंबून राहावे लागत नसून, यासंबंधाची उत्तम खात्रीलायक माहिती त्याच काळात झालेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत सविस्तर मिळते.
या आरमारी मंडळाबद्दल व आरमारी खात्याबद्दल माहिती समजण्यास आपणांस केवळ मेग्यास्थिनीस याच्या सारख्या परकीयांवर अवलंबून राहावे लागत नसून, यासंबंधाची उत्तम खात्रीलायक माहिती त्याच काळात झालेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत सविस्तर मिळते.
आरमारखात्याच्या वरिष्ठाला नावाध्यक्ष असे नाव असे. त्याने समुद्र, नद्या, सरोवरे, यांतून चालणार्या सर्व नौकांवर देखरेख करावयाची असे. बंदरावरील कर वसूल झाला की नाही हे त्याने प्रथम पाहावयाचे असे. या निरनिराळ्या प्रकारच्या बंदरांवरील करांकडे पाहिले असता त्या काळी समुद्रावरील चळवळी कोणत्या प्रकारच्या व दर्जाच्या होत्या हे उघड होते. समुद्रकाठची व नदीकाठचीं गावे, कोळी लोक, व्यापारी, उतारू वगैरेंना हे कर भरावे लागत.
नावध्यक्षाला द्यावयाच्या या करांखेरीज, दुसरे निरनिराळ्या प्रकारचे नौका कर असत. उतारू लोक बरोबर जी जनावरे व जिन्नसा घेत त्या मानाने माषकरूपांत कर द्यावा लागे. गाड्या, ओझ्याची जनावरे, व मालाचे गठ्ठे यांवर नौका कर असे.
करवसूलीखेरीज नावाध्यक्षाला बंदरासंबंधी नियमांची अंमलबजावणी करावी लागत असे. हे नियम नौकांना संकटमुक्त करून त्यांना लागेल ती मदत देण्यास तत्पर असत. दुसर्याची बायको किंवा मुलगी पळविणारा, दुसर्यांचे धन हरण करणारा, गुन्ह्याचा संशय असलेला मनुष्य, ढोंगी बैरागी वगैरेंना अडविण्याचा नावध्यक्षाला अधिकार असे तो नियम मोडणाराचे धन किंवा माल जप्त करवीत असे. अधिकारी लोक परकीयांवर बारीक नजर ठेवून त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था उत्तम ठेवीत.
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांतील मौर्य साम्राज्याचे परकीय राष्ट्रांशी सतत दळणवळण असे व बरेचसे परकीय लोक कामानिमित्त मौर्य राजधानीला येत. त्यावेळी मौर्य साम्राज्याचा बाह्य व्यापार इतका वाढला होता की नुसती आयात मालावरील जकात घेतल्यास, ते एक मोठे वाढते उत्पन्नाचे साधन होई.
अशोक मौर्याच्या कारकीर्दीत तर हिंदुस्थान हे जगांतील व्यापाराचे व अध्यात्मज्ञानाचे केंद्र बनले होते व त्याला ही योग्यता प्राप्त होण्याला उत्कृष्ट राष्ट्रीयनौकानयन व दळणवळणाची पद्धत हीच उपयोगी पडली असली पाहिजेत.
अलेक्झांडरला मौर्यकालीन भारत देशातील जहाजांची मोठीच मदत झाली होती. भारतीय नौकानयन विद्या शिकून अलेक्झांडरच्या लोकांनी सैन्य वाहून नेण्यास अशी २००० जहाजे तयार केली होती.
सारांश, आजच्या एकविसाव्या शतकातील राज्यकारभाराच्या ज्या सुधारणा आढळतात, त्या किंचित् फेरफाराने या मौर्य साम्राज्यांतही होत्या.
अत्यंत महत्वाचे: खूप साऱ्या गोष्टी आपण इंग्रजांकडून शिकलो असा जो भ्रम आपल्या लोकांच्या मनात आहे तो थोडा दूर केला पाहिजे.
युरोपियन अभ्यासक आपली भाषा शिकून आपली पुस्तके दणादण भाषांतरित करून युरोपात नेत होती. ती त्यांच्या सुधारणेसाठीच. महाराष्ट्र धर्मवरील काही जुन्या लेखांत मी ह्या विषयी लिहिलेले आहे.
इतिहास वाचताना मला नेहमी असे दिसून येते कि युरोपियनांनी 'आपलंच फिरून आपल्याला दिले आहे.'
म्हणून इतिहास शिकायचा असतो.
तुज आहे तुजपाशी
परी तू जागा चुकलासी
परी तू जागा चुकलासी
कल्पतरू तो असता दारी
वणवण फिरशी का बाजारी..
वणवण फिरशी का बाजारी..
तर असा वैभवशाली मौर्य साम्राज्याचा इतिहास.
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
No comments:
Post a Comment