विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब

महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब.

जिजाऊ आईसाहेबांचे सर्व आयुष्य जर पाहिले तर प्रचंड धैर्य, शौर्य, साहस, पराक्रम, कष्ट आणी त्याग ह्यांनी भरलेले दिसते.
  • निजामशाहीच्या दौलताबाद येथील दरबारात झालेली वडिलांची आणी भावांच्या हत्या पाहिल्या.
  • आयुष्यभर पतीपासून दूर राहून पतीचा वियोग सहन केला.
  • जेष्ठ पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या जवळ बंगळुरास राहिल्यामुळे आयुष्यभर पुत्र वियोग सहन केला.
  • जेष्ठ पुत्र संभाजी राजांची विजापूर दरबाराने षडयंत्र रचून केलेली हत्या पाहिली.
  • विजापूर दरबाराने आपल्या पतीस अपमानित करून हातकड्या लावून साखळदंडाने बांधून नेलेले पाहिले.
  • पतीच्या निधनानंतर म्हणजे शहाजी राजांच्या मृत्यूनंतरचा वियोग पाहिला.
  • 'रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग..' म्हणत जीवावर उदार होऊन रणांगण गाजविणारे कनिष्ठ पुत्र शिवाजी राजांचे महा-पराक्रम, साहस पाहिले.
  • प्रसंगी स्वराज्यासाठी हातात तलवार घेऊन रणांगणावर जाण्याची धमक दाखविली. स्वराज्य रक्षिले, स्वराज्य वाढविले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांवर दिवस रात्र आलेली संकटे पाहिली.
सगळ्यात महत्वाचे: पातशह्यांच्या छाताडावर पाय देऊन आणी मुघल सल्तनत पालथी घालून मराठ्यांचा छत्रपती निर्माण केला. अतुल्य साहस केले.
मुलगा शिवाजीराजे ह्यांनी जिजाऊ आईसाहेबांस त्यांच्या सर्व त्यागाचे फळ मिळवून दिले. आता ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राज्यभिषेक करून श्रीमंत राजमान्य राजश्री छत्रपती झाले आणी जिजाऊ आईसाहेबांस 'राजमाता' केले.
जिजाऊ आईसाहेबांनी सर्व प्रजेवर आपल्याच लेकरा सारखे अथांग प्रेम केले. रयत जपली, पोटाशी धरली. स्वराज्य जपले आणि वाढविले.
त्यांच्या ह्या त्यागामुळेच प्रत्येक आईला जिजाऊ आईसाहेब व्हावेसे वाटते आणी आपल्या पोटी शिवाजी राजांसारखा थोर पुत्र जन्मास यावा असे वाटते.
जेष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री, तारीख १७ जून १६७४ रोजी जिजाऊ आईसाहेब रायगडाखालील पाचाड मुक्कामी निधन पावल्या.
जिजाऊ आईसाहेबांच्या पावन स्मृतीस समर्पित...
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...