*आटोळे कुटुंब*
postsaambhar :क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा)🚩🚩🚩
आटोळे कुटुंब हे जाचकाप्रमाणे प्राचीन आहेत .ते
सुपे परगण्यातील मौजे शिर्सुफळचे पाटील होते .या कुटुंबा पैकी सर्वात
जुने नाव मोकाशी हे आहे .१७२६ ते २७ मध्ये निजामाने स्वराज्यावर स्वारी
केली तेव्हा छत्रपती शाहू महाराज यांनी आटोळे परिवाराला कान्होजीची मदत
करण्यास सांगितले .
आटोळे कुटुंबाचा वंशवृक्ष
शाखा A
1 तुकोजीराव = बजाजी
2 मकाजीराव = संताजी
3 हिरोजीराव = सयाजी
4 पुंजाजीराव = सिवाजी
5 सखोजीराव = केरोजी
6 आबाजीराव = सिरसोजी
7 मेऊजीराव = माणकोजी
(बजाजी व संताजी आटोळे हे चुलतबंधू होत)
( टिप - शाहू दफ्तर अ २१३८ , गुणे व्हि.टी.ज्युडीशीयल सिस्टीम अॉफ द मराठाज पृ.२८८ - २९१.)
आटोळे कुटुंबातील अनेक सरदारांना छत्रपती शाहू महाराजांनी
कर्तबगार व्यक्तींना मानाचे पुरस्कार दिलेले आढळतात .सरदार संताजी आटोळे
यांना समशेरबहाद्दर हा किताब देण्यात आलेला होता .तसेच पेशव्यांनी संताजी
आटोळे यांना बालाघाट व विदर्भातील जहागीरी दिली .त्यामुळे शिर्सुफळ येथील
आटोळे यांची एक शाखा बालाघाट (बुलढाना ) येथील शेळगाव आटोळ येथे स्थायीक
झालेली आहे .याच आटोळे यांचे वंशज आजही तेथे राहतात .
आटोळे यांच्या परीवारातील दुसरी शाखा ही शिर्सुफळ येथेच स्थायीक
झालेली आढळते .यामध्ये तुकोजीराव पाटील आटोळे यांचे चिरंजीव सरदार बजाजी
पाटील आटोळे हे आढळतात .याच बजाजी सरदारांना शाहू महाराजांनी
*सेनाबारासहस्त्री* ही पदवी दिलेली आढळते .सरदार बजाजी पाटील आटोळे
यांच्या कडे शिर्सुफळ या गावाची जहागीर असल्यामुळे गावातील वेगवेगळ्या
वास्तू कलेत त्यांचा ठसा दिसून येतो .यामध्ये शिरसाई देवीच्या मंदिराचा
जिर्णद्दार केल्याचे पहावयास मिळते .आजही जर मंदिरात जाताना पाहिले तर
दरवाजाच्या पायरीवर अतिशय कोरीव अक्षरात *बजाजी पाटील आटोळे गौड मुकादम
मौजे शिर्सुफळ* अशा आशयाचा मजकूर पहावयास मिळतो .
बजाजी पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांनी शिर्सुफळ गावच्या
वेशीपाशी ओढ्याच्या किनाऱ्यावर म्हणजेच ओढ्याच्या उंचवटा भाग टेकडीवर जो
कि गावाकडं तोंड करून दगडावर कोरीव नक्षीदार असे मंदिर बांधलेले आहे .या
मंदिरात बजाजी पाटील आटोळे यांची अशी एक मूर्ती आढळून येते कि तिचे वर्णन
*घोड्यावर बसून हातामध्ये विजयी शस्त्र तलवार आणि त्यांच्या डोक्यावर
लढाईतील जिरे टोप जो कि मोठ्या सरदारांकडे पहायला मिळतो तसेच अंगावर चिलखत
आढळते, तसेच घोड्याच्या पुढे एक सैनिक आणि पाठीमागे एक सैनिक आहे.* अशा
प्रकारची मूर्ती पहायला मिळते .सध्या हे मंदिर पूर्णपणे ढासळलेल्या
भग्नअवस्थेत आहे .
सदर माहिती ही शाहू दफ्तर तसेच नागपूरच्या
भोसल्यांची बखर यातून मिळवलेली आहे .तसेच या माहिती मध्ये डॉ .विजयराव
कोकणे सर यांचा गेल्या 30-35 वर्षांचा अभ्यास व अथक परिश्रम अत्यंत उपयोगी
आले.त्याचबरोबर संघटनेच्या पदाधिकार्यांनी सातत्याने पाठपुरावा व
अभ्यासदौरे करुन ही अनमोल माहिती मिळवली आहे.सदरचे ऐतिहासिक कागदपत्रं आज
संघटनेकडे पाहावयास उपलब्ध आहेत.
*"क्षत्रिय सगर राजपूत संघटना , महाराष्ट्र राज्य"*🚩🚩
No comments:
Post a Comment