## होनाजी बाळा ##
मराठी वड:मयातील अस्सल बानकशी सोन म्हणजे लावण्या आणि पोवाडे . या पोवाड्यातून मराठी जीवनाचे आणि इतिहासाचे प्रतिबिंब तत्कालीन शाहिरांनी उमटवलेले दिसते .या पैकी एक होनाजी आणि त्याचा मित्र बाळा
...
.होनाजीचा जन्म एक गवळ्याच्या कुटुंबात झाला. होनाजी सासवड मधील धान्य बाजारपेठेतील शेंडग्यांच्या दुकानाच्या आसपास राहत होता . आजोबा शांताप्पा शिलारखाने आणि चुलता बाळा शिलारखाने हे नावाजलेले शाहीर होते त्यांचाच व्यवसाय होनांजी करू लागला . पेशवे वाड्यावर दूध घालणे आणि सध्याच्या पालखी मैदान आणि सोपाननगर परिसरामध्ये गाई चारणे
.. यदिनक्रमातून "घनश्याम सुन्दर श्रीधरा अरुणोदय झाला "या प्रसन्न सात्विक व श्रध्दामय भूपाळीचा जन्म झाला तो या सासवडच्या माळावर
.माझ्या ग्रामदैवतास
कालभैरवनाथास पहिले शाहिरीचे पुष्प येथेच त्यांनी वाहिले . मराठीशाहीच्या
उदयाबरोबरच शाहिरी काव्य जन्माला आले विस्ताराबरोबरच वाढले आणि अस्ताबरोबरच
विराम पावले पोवाड्यात वीररसानी बहू रुंद झालेतसेच शृंगारिक लावणीने
मनधुंद झाले असे हे लावणी आणि पोवाडे वाड:मय,शृंगारप्रिय रसिक
महाराष्ट्राच्या "अमर भूपाळीकार" शाहीर होनाजी बाळाच्या डफच्या थापेवर अन
तुणतुण्याच्या तारेवर आख्या महाराष्ट्र डोलला .
होनाजीचा चुलता बाळा
आणि त्याच्या एक रंगारी मित्र बहिरू हा रंगारी होता त्यांचा वारसा होनाजीने
त्याचा मित्र बाळा करंजकर याला बरोबर घेऊन चालवला . बाळा करंजकर हा सासवड
मधील शिंद्यांच्या वाड्यात भैवनाथ मंदिर जवळ राहत होता .
बाळा
करंजकरानेही या महाराष्ट्राला उत्कृष्ट लावण्या दिल्या आहेत .होनाजी त्याचे
रचलेल्या लावण्याची म्हणत असे . जिवलंग मैत्रीमुळे" होनाजी बाळा "हे नाव
इतिहासात अजरामर झाले .
होनाजीचे कार्य म्हणजे होनाजीने लावणीमध्ये
शास्त्रीय संगीत आणून ढोलकी व इतर वाद्यांचा समावेश त्या काळी केला हे एक
धाडस त्याकाळात त्याने केलेले दिसते . परंतु यामुळे त्याचे अनेक हितशत्रू
तयार झाले .
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कान कोणीतरी भरले व
लावणीच्या कार्यक्रमात होनाजीला तबला जाण्यास मनाई करण्यात आली .होनाजी
निराश झाला त्याने आपली शिष्या " अहिली" हिला घेऊन मुंबई गाठले आणि शात्रीय
गायनाचे धडे तिला देऊन पुन्हा उभारीने तबला आणि शात्रीय गायनाचा प्रवेश
लावणीत केला
याचे श्रेय होनाजी आणि बाळा यांना जाते . होनाजीचे जीवन अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले दिसते .
होनाजी बाळा" हे नाव इतिहासात अजरामर झाले . दुसया बाजीराव पेशवांच्या
कारभारी त्र डेंगळे यांचे होनाजीस खूप सहकार्य लाभले होते . त्याने आपल्या
आयुष्यात कमावलेली संपत्ती डेंगळ्यांच्या वाड्यात ठेवली होती . पेशवाईच्या
अस्तामुळे इंग्रजांनी त्र्यिंबकजी डेंगळेची संपत्ती जप्त झाली .
त्यामध्ये होनाजीची सर्व संपत्तीही गेली . होनाजी कफ्फल्लक झाला
. नंतर मात्र कोठून तरी चार पैसे मिळवावेत आणि चरितार्थ चालावा असे दिवस तो घालवू लागला
. होनाजीने आपल्या पोवाड्यात पेशवाईच्या अस्ताचे वर्णन यतार्थ व
हृदयविदारक दृश्य रेखाटले आहे. पेशवाईचे रंग आणि ढंग मोठ्या कौशल्याने व
कलात्मकतेने यथेच्चपणे रंगवले आहे होनाजीचा लावण्याअंतरिक प्रीती वसामाजिक
नीती यांची कदर कांकणभर जास्तच जाणवते .
. होनाजीचा लावणीची रचना ओघवती सरळ व शब्दलालित्याने नटलेली असून तीत अर्थ गांभीर्य योजकता ,कल्पकता दिसून येते
. "अमर भूपाळी या बरोबरच
"सांगा मुकुंद कुणी हा पहिला ,
लटपट लटपट तुझं चालणं
इत्यादी अनेक गाणी मूळ होनाजीच्याच रचनेतून थोड्या फार फरकाने घेतली आहेत
"सूर खडा शाहिरी धडाडा ,म्हणे पोवाडा जोसात ।
थेट तशी मग नेट लावुनी सुरकारी करी साथ|
नसानसात रक्त रसाला येईल आज उधाण जरा ।
आयुष्यातील सर्व वाटचालीत होनाजीने खूप यश मिळवले पण प्रसिद्धीने काही
जणांना त्रास झाल्यामुळे व परिस्थितीने वआर्थिक विवंचनेने होनाजीची
परिस्थिती खालावली
त्यामुळे "होन्याचा झाला चुना "अशा प्रकारे त्याची
संभावना झाली . होनाजीवर मारेकरी घालण्यात आहे . दिवे घाटाच्या खालील बाभूळ
वनात मारेकऱ्यांनी त्याचा खून केला . अत्यंत घायाळ झालेल्या होनाजीचा
प्रचंड वेदनेने मृत्यू झाला. तो दिवस होता भाद्रपद कृष्णचतुर्दशी त्या
दिवशी ६ ऑक्टोबर तारीख होती .
No comments:
Post a Comment