छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी आणि थोरल्या शाहुमहाराजांच्या आई म्हणजे येसुबाई साहेब. 🙏
प्राचीन काळापासून #मुद्रा म्हणजे शिक्क्यांचा वापर होत आला आहे. शिक्के म्हणजे चलनी नाणी नव्हे तर पत्रावरील शिक्के. छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनीही आपली राजमुद्रा चालवली होती. या राजाच्या मुद्रांना ‘नाममुद्रा’ म्हणतात. पत्रांवर या मुद्रा अंकीत केलेल्या असायच्या जेणेकरुन पत्रांचा अस्सलपणा कळावा आणि इतरही काही हेतु होते. मध्ययुगीन काळात फ़र्मान, सनदांवर हि मुद्रा असायची. मराठ्यांनी आपल्या पत्रांवर ‘शिक्का’ म्हणजे ‘नाममुद्रा’ आणि ‘मुरत्तब/ मोर्तब’ म्हणजे ‘समाप्तीमुद्रा’ या दोन मुद्रा वापरल्या तर काही पत्रांवर प्रधांनांच्या मुद्रा देखील होत्या. या मुद्रा पाहिल्या असता ‘शिक्का’ हा नेहमी ‘मुरत्तब/ मोर्तब’ पेक्षा मोठा आकाराचा होता. त्याकाळी या दोनहि मुद्रा शक्यतो सोबत ठेवल्या जायच्या. या मुद्रांना पकडण्यासाठी जागा असायची या मुद्रा शक्यतो सोण्याच्या अंगासह मुद्रेचा पुढील लिखीत भाग चांदिचा असायचा, काही संपुर्ण चांदिच्या असायच्या तर काही तांबे आणि पितळाच्या देखील होत्या. या मुद्रांवर नक्षी असायची. आपल्याकडे शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या अशा अस्सल मुद्रा उपलब्ध नसल्या तरी छत्रपती घराण्यातील काही मुद्रा पाहुन आपण हा अंदाज लावू शकतो. तर आता आपण बोलुया ‘येसुबाईसाहेब’ यांच्या मुद्रेविषयी.
छत्रपतींच्या व इतर सरदारांच्या काही मुद्रा या साताऱ्याच्या खजिन्यात होत्या. नंतर पुढे ब्रिटीशांची सत्ता आली आणि सातारा संस्थान हे ब्रिटिशांशी जोडल्या गेले व इ.स. 1875 ला त्या मुद्रा रॉयल एशियाटिक सोसायटी कडे जमा करण्यात आल्या. त्यांना त्याची काळजी घेण्यास सांगितली गेली. यामधे बऱ्याच विविध नाममुद्रा म्हणजेच शिक्के आणि मुरत्तब/ मोर्तब म्हणजे समाप्तीमुद्रा होत्या. त्यात एक मुद्रा ‘येसुबाईसाहेब’ यांची देखील होती!
राजमाता जिजाऊनी आपला शिक्का चालवला होता त्याबद्दलही कधीतरी सविस्तर लिहीता येइल. जिजाउंनंतर हि येसुबाईंची मुद्रा पाहुन त्याकाळीही स्त्रियांचा प्रशासनात असलेला सहभाग आपल्या लक्षात येतो. येसुबाईसाहेब या पिलाजीराजे शिर्के यांच्या कन्या, शाहु महाराजांच्या आई आणि छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी होत्या.
येसुबाईंची हि मुद्रा ‘नाममुद्रा’ आहे. या मुद्रेसोबतचे मुरत्तब/ मोर्तब उपलब्ध नाही. हि नाममुद्रा चांदिची असुन गोलाकार आहे. या मुद्रेचा व्यास 1 इंच आहे. बाकी छत्रपतींच्या सर्व मुद्रा या आपल्याला देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेत दिसतात पण येसुबाईंची हि मुद्रा मात्र पर्शियन भाषेत आहे (फारसीत का आहे याबद्दल कुणी अधिक सांगु शकत असेल तर कृपया सांगावे) तिन ओळीत या मुद्रेवर लेख आहे. माझ्या वाचण्याप्रमाणे तो लेख खालुन- वर ‘राजा सनह अहद वालीदा शाहु येसुबाई’ असा आहे पण याला योग्य रित्या ‘राजा शाहु वालीदा येसुबाई सनह अहद’ असे आपण वाचु शकतो. शिक्क्यावर फक्त 'वालीदा' आहे 'वालीदाये' नाही. 'ये' ची मात्रा नसल्याने नेमके कसे वाचावे यात मला संभ्रम आहे. 'ये' ची मात्रा असती तर वरून म्हणजे 'येसूबाई वालीदाये राजा शाहू सनह अहद' अस वाचता आलं असत. याबद्दल अधिक माहिती कुणी सांगू शकेल तर स्वागत आहे. या नाममुद्रेचा अर्थ ‘राजा शाहु यांच्या मातोश्री येसुबाई’ आणि ‘सनह अहद’ म्हणजे ‘प्रथम वर्ष’ उर्दु फारसी मधे प्रथम वर्षाला अहद असे म्हणतात (वाचनात काही सुधार असतील तर कळवावे). खाली दिलेल्या फोटोत ‘राजा शाहु’ हिरव्या रंगात, ‘वालीदा’ निळ्या रंगात, ‘येसुबाई’ लाल रंगात, आणि ‘सनह अहद’ हे केशरी रंगात दिलेले आहे. महाराणी येसूबाई आणि शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असताना ही मुद्रा चालवली गेली असावी.
तर अशी आहे महाराणी येसुबाई यांची मुद्रा. आपल्याला हि माहीती आवडली असेल अशी आशा. पुढेही इतिहासातील अशीच दुर्मिळ माहिती मी आपल्या पर्यंत पोहोचवत राहिन.
आवडल्यास नावानीशी पुढ़े शेयर करा.

'#सखी_राज्ञी_जयती' ही येसूबाईंची सांगण्यात येणारी मुद्रा कोणत्या पत्रावर छापलेली आहे ? किंवा त्याचा संदर्भ काय ? कुणाला माहिती असेल तर कृपया सांगावे.
धन्यवाद.
आशुतोष सुनिल पाटील.
आशुतोष सुनिल पाटील.
No comments:
Post a Comment