मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 November 2020
काशीबाई बाजीराव पेशवे
काशीबाई बाजीराव पेशवे
काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते. ११ मार्च, १७२० ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.
विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले-
बाळाजी बाजीराव पेशवे
रामचंद्र
रघुनाथराव पेशवे
जनार्दन
काशीबाईंना घरांत ताई म्हणत. त्यांची सासू राधाबाई शहाणी व प्रसंग पडल्यास राज्यकारस्थानेहीतडीस नेण्यात कुशल होती, तशा
प्रकारची कर्तबगारी काशीबाईत दिसत नाही. कदाचित सासू घरांत दीर्घकाळ मुख्य असल्यामुळे काशीबाईला स्वयंप्रकाश दाखविण्यास अवसर मिळाला नाही.
पण काशीबाई प्रकृतीने बरीचशी अधू होती. १७३९ मध्ये तिला बराच आजार झाला, त्यासाठी दाया आणल्या, वैद्य आणले, उपचार केले, असे
उल्लेख आहेत, पाय दुखत असत यावरून संधिवाताचा विकार असावा.
"आम्हांस ठेवले आहा, त्याप्रमाणें कुशल आहों" असे तिचे उपरोधिक उद्गार त्यांचे एका पत्रात आहेत, "नाथपंथी फकीर यास काशीबाईंचे औषध करावयादाखल रुपये दहा” खर्च पडले आहेत."
“काशीबाई वाहिनीचा पाय बरा असल्यास
त्यांनाही समुद्रस्नानास पाठविणे" असें १७३७ त चिमाजी लिहितो. “नबाबाचे सरकारांत भरमणा म्हणून वैद्य काशीबाईंचा पाय निश्चयपूर्वक बरा करीन म्हणतो, त्याचा उपचार केला.
असे त्यांच्या प्रकृतीविषयी उल्लेख उपलब्ध आहेत.
बाजीरावांची पत्नी काशीबाई ही पतिनिष्ठ, गरीब व स्वभावाची दिसते. १७४२ मध्ये रामेश्वरची व १७४६ मध्ये काशीची यात्रा केल्यावर किशीबाईंचा २७ नोव्हेंबर, १७५८ रोजी मृत्यू झाला.
(वरील चित्र प्रतिकात्मक आहे)
©maratha_riyasat
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment