विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 24 November 2020

लाछित बोडफुकन


 लाछित बोडफुकन

खरं म्हणजे कुणा शूर योद्ध्याची उपमा दुसऱ्या कुणाला देऊ नये. पण लाछीत बोडफुकन यांचे पराक्रम पाहिजे की, आपल्या मराठ्यांना महाराजांची आठवण येते.
आसामचा राजा जयध्वज सिंगावर मुघलांनी मोठी नामुष्की आणली होती. जयध्वजाला आपली मुलगी मुघल जनान्यात देने भाग पडले व इच्छेविरुद्ध औरंगजेबाशी तह करावे लागले.या गोष्टीचा धसका घेऊन जयध्वज मरण पावला. जयध्वजाचा मुलगा चक्रध्वज याने लाछित बोडफुकन यांना सेनापती केले आणि मोगलांशी यशस्वी लढा दिला.
दुर्गम असलेल्या आसामच्या डोंगरांचा गनिमी काव्यासाठी त्यांनी फायदा करून घेतला.
इतिहासप्रसिद्ध 'सराईघाटच्या लढाईत' लाछित यांनी मुघलांच्या जहाजांचा चुराडा करत आपल्या पराक्रमाचे थोर तमाशे मुघलांना दाखवून दिले. सराईघाटच्या लढाई नंतर लाछित मृत्यू पावले.
आज जसा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांमुळे टिकला तसेच लाछित यांचा जन्मही आसामला मुघलांच्या वाकड्या नजरेपासून वाचवण्यासाठी झाला होता हे समजते.
आजच्याच दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर १६२२ रोजी लाछित यांचा जन्म झाला होता. आसाममध्ये व देशभर आजचा दिवस "लाछित दिन" म्हणून साजरा केला जातो.
अशा या थोर सेनापतीचा इतिहासाला कदापि विसर पडता कामा नये! कोटी अभिवादन!
(सदर आणि चित्र आणि माहिती @pahadi

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...