नानासाहेब पेशवे
कार्यकाळ- (१७४०~१७६१)
अपत्ये- विश्वासराव,माधवराव,नारायणराव
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले.
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती
नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली.
थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले.
त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती.
परंतु १७६१च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
नानासाहेब पेशव्यांच्या राजकारणी धोरणाला इंग्रजांचे आक्रमण फारसे उमगले नाही असा त्यांच्या वर मोठा आक्षेप आहे. निजामासारखेच इंग्रज आहेत असे मानुन नानासाहेबांनी आंग्र्यांच्या विरोधात इंग्रजांची मदत घेतली.
नानासाहेब पेशवे यांच्या काळात १७५६ मध्ये आंग्र्यांचे पश्चिम किनारपट्टीवरून उच्चाटन व १७६१ मधील मराठ्यांचा पानीपतावरील पराभव या कारणांनी इंग्रज दोन प्रतिस्पर्धी शेजार्यांच्या मगरमिठीतून मुक्त झाले आणि त्यांची सत्ता वाढीस लागली.
असे असतानाही श्रीमंत नानासाहेब पेशवे इतर समकालीन सत्ताधार्यांच्या तुलनेत महानच आहेत असेट म्हणावे लागेल, नाहीतर १७५५-६० मध्येच आरकाट, प्लासी पाठोपाठ महाराष्ट्राचाही शेवट होणे अशक्य नव्हते!!
©maratha_riyasat
No comments:
Post a Comment