समशेर बहादुर-
समशेरबहाद्दर उर्फ कृष्णसिंग, बाजीराव पेशव्यांना मस्तानीपासुन झालेला हा पुत्र.
समशेर हा मुळातच पराक्रमी, बहादुरीबद्दल आणि त्याची स्वामिनिष्ठा पाहून त्याला साहेब नौबतीचा मान नानासाहेबांनी दिला आणि शिक्का वापरण्याचीही परवानगी दिली.
'श्री बल्लाळ चरणी तत्पर। समशेरबहाद्दूर निरंतर।।' अशी त्याची मुद्रा होती.
१७५८ साली समशेर बहाद्दरला मेहेरबाईपासून पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव 'अलिबहाद्दूर' असे ठेवण्यात आले.
पुढे १७६१ साली विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत समशेरबहाद्दर हाही पानिपतावर लढला. त्यातच समशेर जखमी झाला.तिथुनच जवळ भरतपुर या ठिकाणी तो मरण पावला. तिथे त्याची कबर आजही आहे. त्याची नित्य पूजाही चालु आहे. स्थानिक लोक त्या कबरीला 'बडे अवलिया'ची कबर म्हणतात.
समशेरबहाद्दरच्या पत्नीला आणि मुलाला पुढे थोरले माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले. पुढे नाना फडणवीसांनी त्यांना महादजी शिंद्यांच्या मदतीने बुंदेलखंडातील बांदा येथे एक वेगळे संस्थान निर्माण करण्याचा सल्ला दिला.
त्याप्रमाणे अलिबहाद्दूर यांनी स्वतःचे संस्थान निर्माण केले आणि ते बांद्याचे नबाब झाले. कलिवर
किल्ला घेत असताना अलीबहाहर १८०२ साली मारला गेला. त्याची स्त्री बादशहा बेगम लहानपणीच वारली, दुलज बेगम व बक्शी बेगम
अशा आणखी दोन बायका त्यास असून दुलज बेगमचा मुलगा समशेर बहाहर व बक्षी बेगमचा झुल्फिकार अली. अलीबहादराचा मुलगा समशेर बहादुर दुसरा याला इंग्रज सरकारने चार लाखांचा
तनखा देऊन बांद्याची जहागीर १८०४ मध्ये खालसा केली.
हा समशेर बहाहर १८२३ मध्ये मरण पावला. पुढे त्याचा भाऊ झुल्फिकारअली बांद्याचा नवाब झाला. तोही त्याच साली वारला. त्याचा मुलगा अलीबरहादूर नबाबगिरीवर असताना सत्तावन सालचे बंड झाले, त्या गडबडीत बांद्याचा शुंगारलेला वाडा व जडजवाहीर जळुन गेले. त्यानंतर इंग्रजांनी बादा शहर आपल्या ताब्यात घेऊन नबाबास ३६००० रुपयांची नेमणूक देऊन आपक्या नजरेखिली इंदुरास ठेवले, तेथे त्याचे आजही वंशज आहेत. बादा येथे नशाबाची मशीद आहे, ती या नबाबांच्या वैभवाची साक्ष देते.
त्यांच्या घराण्याने नंतर पेशव्यांचा वंश वाढविला, टिकवला आणि आता पेशव्यांच्या अस्सल रक्ताचा वंश अवैझबहादर हा इंदूर येथे असून पेशव्यांचे नाव उज्ज्वल करत आहे.
श्रीमंत सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्यासोबतच पानिपत येथे मराठ्यांकडुन लढताना समशेरबहाद्दर याचाही मृत्यु झाला. मात्र याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यासाठीच थोडक्यात माहिती देण्याचा केलेला हा प्रयत्न!
लेखन /माहिती संकलन -@मराठा रियासत
No comments:
Post a Comment