विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

दक्षिण कोकण व संगमेश्वर भागात विखुरलेली 👇👇👇 साळुंखे चाळुक्यांची वंशज घराणी

 









दक्षिण कोकण व संगमेश्वर भागात विखुरलेली

👇👇👇
साळुंखे चाळुक्यांची वंशज घराणी
-------------------
@........................✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख
बादामी चाळुक्य साळुंक्यांचे थेट वंशज असलेल्या उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्य वंशजांच्या संगमेश्वर राजवटीच्या अस्तित्वाच्या ऐतिहासिक नोंदी इ.सनाच्या तेराव्या शतकाच्या शेवटापर्यंत मिळतात. अलकनंदा वरुणा आणि शास्त्री या तीन नद्यांच्या संगमावर बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि त्या परिघात आजही कल्याण चाळुक्यांच्या अर्थात साळुंखे यांच्या संगमेश्वर राजवटीतील अनेक वंशजांची गावे अस्तित्वात असलेली दिसतात.
राजे साळुंखे चाळुक्य यांचे तेराव्या शतकाच्या अंताला अथवा चौदाव्या शतकात संगमेश्वर राज्य गेल्यानंतर या घराण्यातील असलेल्या वंशजांनी त्यानंतरची मुस्लिमशाही, मराठेशाही आणि त्यापुढील काळात सरदार घराण्यात कन्व्हर्ट होऊन अनेक पराक्रमी इतिहास रचले. त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक युद्धाची मैदाने गाजवून आपल्या पराक्रमी मनगटी शौर्याच्या जोरावर या भागातील गावांची काही वतनेही संपादित केली असल्याचे या वंशजातून सांगण्यात येते.
कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे चाळुक्य चौथा याची इ.सन ११८९ मध्ये कल्याण येथील सत्ता गेल्यावर कल्याण नरेश सोमेश्वर साळुंखे याने त्याच्या साम्राज्याच्या सीमा अजून दक्षिणेकडे सरकवल्या. त्याच्या राज्य विस्ताराच्या या ऐतिहासिक नोंदी इ.सन १२०० पर्यंत उपलब्ध होतात. सोमेश्वर साळुंखे चाळुक्याच्या राज्य अस्तित्वाच्या त्यापुढील नोंदी दक्षिण कोकणातील संगमेश्वर भागात मिळतात. कल्याण चाळुक्यांच्या दक्षिण कोकण भागातील राजवटीची तेराव्या शतकाच्या शेवटापर्यंत संगमेश्वर ही राजधानी राहिली होती.
संगमेश्वर भागात चाळुक्यांची अनेक वंशज घराणी आजही आढळून येतात. साळुंखे चाळुक्यांच्या वंशातील वंशज असलेल्या या घराण्यांचा आज आपण "साळुंखे राजवंशाचा वैभवशाली
इतिहास" या श्रंखलेतील लेखमालेत आजच्या आणि उद्याच्या भागात दृष्टिक्षेप टाकणार आहोत. या दृष्टिक्षेपामध्ये स्वराज्याच्या कार्यात मोलाची कामगिरी निभावलेल्या साळुंखे चाळुक्य वंशजातील इंदुलकरांचे नाव येथे अगदी वरच्या क्रमांकाने आवर्जून घ्यावे लागेल.
इंदुलकर हे चाळुक्य साळुंखे राजवंशातील वंशजांचे एक महत्त्वाचे प्रतिष्ठित पडनाव आहे. इंदुलकर, इंदलकर आणि इंदप ही एकाच धाटणीतील वाटणारी तिन्ही प्रतिष्ठित पडनावे साळुंखे चाळुक्य राजवंशातील वंशजांची आहेत. साळुंखे राजवंशातील वंशज असलेल्या इंदुलकरांची संगमेश्वर तालुक्यात विघ्रवली, कुळे आणि हेडली ही तीन गावे आहेत. हेडली आणि संगमेश्वर यांचे हवाई अंतर पाच ते सहा किलोमीटर भरेल, तर विघ्रवली व कुळे या दोन गावांचे संगमेश्वर येथून हवाई अंतर बारा ते पंधरा किलोमीटर भरेल. इंदुलकरांचे तिरवडे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात असलेले अजून एक गाव असून ही वरील सर्व त्यांच्या (इंदुलकरांच्या) वतनाची गावे असल्याचे या वंशजातून सांगण्यात येते. मात्र दुर्दैवाने वतनाचे कागद कोण्याही गावातील इंदुलकरांनी जतन करून ठेवलेले नसल्याचे दिसून येते.
इंदुलकरांची इंदलकर अशा अजून पडनावाने राहणारी पुणे, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही गावे आढळून येतात. इंदलकर यांची पुरंदर तालुक्यातील वाघापूर, दौंडज, राजेगाव, टेकवडी आणि भोर तालुक्यातील खोपी ही वतनाची अजून काही गावे असल्याचे या वंशजातून सांगण्यात येते; मात्र यांच्याकडे देखील वतनाची तशी कोणतीही कागदपत्रे या लोकांनी सांभाळून ठेवली नसल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यात इंदलकर यांची करंजे, कळंबे आणि उकिरडे ही अजून काही गावे येतात, तर उस्मानाबाद जिल्ह्यात पाटसांगवी आणि माढा तालुक्यातील टेंभुर्णी भागात देखील या आडनावातील लोक आढळून येतात.
दक्षिण कोकण आणि संगमेश्वर भागात साळुंखे चाळुक्यांचे विचारे, महाडिक, अनेराव, साळुंखे, चाळके आणि अजून दुसरेही बरेच वंशज मूळ साळुंखे आडनावाने आणि इतर दुसऱ्या काही पडनावाने वास्तव्याला आहेत. चाळुक्यांच्या या वंशज असलेल्या आणि पडनानावाने राहणाऱ्या वंशज घराण्यावर यापुढील भागात अजून विस्ताराने दृष्टिक्षेप टाकला जाणार आहे.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रा. डॉ. नीरज साळुंखे सर,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...