विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

राजे साळुंखे चाळुक्यांच्या 👇👇👇 राज्यकारभारातील महिलांचाही सहभाग

 


राजे साळुंखे चाळुक्यांच्या

👇👇👇
राज्यकारभारातील महिलांचाही सहभाग
-------------------
........................✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट बादामी चाळुक्यांच्या बादामी, वेंगी, गुजरात, कल्याण या चारही मोठ्या राजवंश शाखेतील राण्या तसेच महिलांकडे वेगवेगळ्या अग्रहारांची किंवा प्रांतिक शासक म्हणून जिम्मेदारी सोपविली जात होती. विशेष म्हणजे या वंशातील राजकुमारीही यात मागे नसत. साळुंखे राजवंशातील राजकुमारी तसेच राण्यांनी देखिल असे शासन चालवताना काही मंदिरादी वास्तूंच्या निर्मिती देखील केलेल्या आहेत.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट बदामी चाळुक्य नरेश विजयादित्य साळुंखे मोहिमेवर असताना त्याचे शासन त्याची बहीण कुंकुमादेवी चालवित होती. साळुंखे चाळुक्य राजवंशातील राजकन्या कुंकुमादेवी हिने लखमेश्वर(नवीन तालुका), जि. गदग येथील शंखाच्या आकारातील बांधलेले मंदिर आणि तिने बांधलेली इतर जैन बस्ती मंदिरेही प्रसिद्ध आहेत.
साळुंखे चाळुक्य राजवंशातील राजकुमारी, राण्या आणि अनेक महिलांनी प्रांतिक शासन चालविल्याची उदाहरणेही आहेत. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश जयसिंह साळुंखेची बहिण अक्कादेवी ही आपला पती कदंब (कदम) नरेश मयूरवर्मन यांच्यासह वनवासी-१२००० या प्रभागाचे शासन सांभाळून होती. चाळुक्यातील अतिशय गुणी राजकन्या म्हणून तिचा लौकिक होता. बदामी नरेश पुलकेशी दुसरा याचा मोठा मुलगा चंद्रादित्य याची राणी विजया भट्टारिका ही अतिशय चाणाक्ष राजकारणी होती. तिने राज्यातील काही अग्रहारे देखील दान दिली होती.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश विक्रमादित्य साळुंखे षष्ठ या राजाला एकंदर सात राण्या होत्या. त्यातील पहीलीचे नाव सावळदेवी असून, मंगळवेढा आणि दरिकाडू नाडाचा महामन्डलेश्वर जोगम रस कलचूर्य याची ती कन्या होती. दुसऱ्या पत्नीचे नाव तारादेवी असून विक्रमादित्याने तिच्याकडे नारायणमंगळ आग्रहाराची व्यवस्था सोपवली होती. राजाने हा गाव तिला खाजगी खर्चासाठी बहाल केलेला होता. लक्ष्मादेवी ही विक्रमादित्याची तिसरी राणी, तिला राजाची परियरसी अर्थात पट्टराणी म्हटले आहे. राजा विक्रमादित्य हे जेव्हा जेव्हा युद्धासाठी मोहिमेवर जात, तेव्हा राणी लक्ष्मादेवी ही कल्याणास राज्य करीत असे. राजाने लक्ष्मादेवी या पट्टराणीला अठरा अग्रहार आणि डन्बल गाव यांची व्यवस्था पाहाण्याचे कार्य सोपविले होते. शिवाय तित्तसिंगि गाव सुद्धा तिच्याच देखरेखीखाली होते.
विक्रमाचि चौथी राणी कदम्ब घराण्यातील जक्कलदेवी होती. तिला राजाने खाजगी खर्चासाठी इनगुणिगे गाव बहाल केले होते. पाचवी राणी मलयमती ही किरिय किरियूर अग्रहारास दिलेल्या परगण्याची व्यवस्था पहात होती. विक्रमादित्य राजाची सहावी राणी चंद्रलेखादेवी ही कोल्हापूरकर शिलाहार राजाची कन्या होती. चंद्रलेखादेवी या राणीला राजा विक्रमादित्य साळुंखे राजाने स्वयंवराला जिंकून वरले होते. अशा या राजाची सातवी पत्नी होती माळलदेवी. चंद्रलेखादेवी आणि माळलदेवी या देखील काही आग्रहारांची व्यवस्था पाहत होत्या.
भारत सरकारने अलीकडच्या काळात जी नवीन शंभराची नोट चलणात आणली आहे; तिच्यावर त्यांनी बादामी चाळुक्यांचे थेट वंशज असलेल्या गुजरात सोळंकी राजवंशाची निर्मित 'रानी की वाव' म्हणजे, सोळंके राजवंशातील राण्यांसाठी निर्मित केलेल्या स्नानगृहाचे छायाचित्र छापले आहे. साळुंखे राजवंशाच्या वैभवशाली इतिहासाचा हा एक सर्वोच्च दाखला भारत सरकारने आजच्या नवीन पिढीसमोर ठेवला आहे. या बारवेचे निर्माण गुजरातेतील चाळुक्य सोळंकी साम्राज्यातील राजमाता उदयामती यांनी इ. स.१०५० च्या सुमारास आपले पती राजा भीमदेव प्रथम यांच्या आठवणीत केले होते. राजमाता उदयामती यांना या कामी त्यांचा मुलगा राजा करणदेव प्रथम याचेही सहकार्य लाभले होते.
गुजरातमध्ये चाळुक्य-सोळंकी-साळुंखे राजवंशाच्या राजमाता उदयामती आणि मुलगा करणदेव प्रथम यांनी निर्मिलेल्या या सुंदर बारवेला (रानी की वाव) यूनेस्कोने दि.२२ जून २०१४ रोजी जागतिक पर्यटन स्थळ (विश्व विरासत स्थल) म्हणून घोषित केले आहे. यूनेस्कोच्या विश्व विरासत समितीने भारतात स्थित असलेल्या अनेक पुरातन बारवांचा अभ्यास करताना याची निवड जागतिक पर्यटन स्थळ म्हणून केली आहे. या विहिरीला जल प्रबंधन प्रणाली आणि भूजल पाणी पातळीचा उत्तम उपयोग करून निर्मिलेल्या एक उत्तम उदाहरण मानले जाते.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
प्रा. डॉ. नीरज साळुंखे सर,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...