विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

राष्ट्रकूट : दक्षिण भारतातील एक सार्वभौम चक्रवर्ती राजवंश

 


राष्ट्रकूट : दक्षिण भारतातील एक सार्वभौम चक्रवर्ती राजवंश

--------------------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख......✍️
------_----
बादामी चाळुक्यानंतर दक्षिणेतील उगम पावलेला एक शक्तिशाली राजवंश म्हणून राष्ट्रकूट राजवंशाकडे पाहिले जाते. या वंशातील अनेक राजे युद्धकलेतील पारंगत होते. राष्ट्रकूटांतील ध्रुव प्रथम याने गंगवाडी (मैसूर)च्या गंगवंशातील राजाला पराजित करून गंगवाडीवर प्रभुत्व मिळवले. कांची (कांचीपुरम)च्या पल्लवांना हरवून बंगाल राजा तथा कान्नोजवर दावा करणाऱ्या प्रतिहार शासकांना पराभवाची धूळ चारली. राष्ट्रकूट कृष्ण द्वितीय याने इ. स. 878 मध्ये सिंहासनावर बसल्यानंतर गुजरातवर स्वारी करून त्यावर कब्जा केला.
हाच भाग मागे अमोघवर्षा प्रथम याच्या हातून गेला होता. पण हाच पराक्रमी राजा राष्ट्रकूट कृष्ण द्वितीय वेंगी चाळुक्यांच्या वेंगीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी असफल राहिला. त्याचा नातू (पौत्र) इंद्र तृतीय हा इ. स. 914 मध्ये सत्तारूढ झाला. त्याने कन्नौजवर कब्जा करून त्याला आपल्या राज्यास जोडले आणि राष्ट्रकूटांच्या शक्तिला एका अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवले. या वंशातील कृष्ण तृतीय याने उत्तर व दक्षिण भारतातील आपले अभियान गतीमान केले आणि राज्य विस्तार केला. कांची तसेच तमिळ मैदानी क्षेत्रात कब्जा जमवला.
राष्ट्रकूट या शक्तिशाली राजवंशाचा उगम दक्षिणेतील लट्टलूर (लातूर) येथील सधन शेतकरी कुटुंबातील समजला जातो. हे लोक कन्नड भाषा बोलणारे असले तरीही त्यांना उत्तर आणि दक्षिणी भाषेचे ज्ञान होते. बादामी चाळुक्यानंतर राष्ट्रकूट वंश दक्षिण भारतातील एक दुसरी मोठी राजनैतिक शक्ती बनला होता. त्यांचे साम्राज्य उत्तरेतील माळव्यापासून दक्षिणेत कांची पर्यंत पसरलेले होते. राष्ट्रकूटांच्या काळात एक मुस्लिम यात्री दक्षिण भारतात येऊन गेला, त्याने राष्ट्रकूटांना दुनियेतील चार महान शासकातील एक मोठा शासक म्हटले आहे. यावरून राष्ट्रकूटांच्या महत्पणाचा अंदाज येतो.
राष्ट्रकूट वंशातील खोट्टिम अमोघवर्ष चतुर्थ (इ. स. 968-972) हा या वंशातील शेवटचा राजा ठरतो. हा राजा आपल्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरला. त्याच्या राज्यातील प्रजेत असंतोष वाढू लागला. या काळात बादामी चाळुक्यांचे वंशज असलेला तैलप साळुंखे याच्यातील राज्य स्थापनेची महत्वकांक्षा वाढली होती. राष्ट्रकूट राजाने राजधानी सोडून पश्चिमी घाटात आश्रय घेतला व गंग आणि कदंब वंशातील राजांच्या सहयोगाने जीवन व्यतीत करू लागला. या काळात तैलप चाळुक्य प्रथम याने इ. स. ९७३ मध्ये कल्याणी चाळुक्य राजवंशाची मुहूर्तमेढ रोवली आणि दक्षिणेत कल्याणी चाळुक्यांच्या रूपाने एका सार्वभौम महासत्तेचा उदय झाला.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
९४२२२४१३३९,
९९२२२४१३३९.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...