विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

साळुंखे/चाळुक्य

 




साळुंखे/चाळुक्य

साळुंखे/चाळुक्य हा देशपातळीवरील इतिहासाला गवसणी घातलेल्या मोजक्या प्रमुख राजघराण्यांपैकी एक असलेला घराणा आहे. हा हजारो वर्षांपासून देशाच्या राजसत्तेच्या पदरात आपल्या राजकर्तव्याचे पुरेपूर माप ओतण्याचे काम केलेला राज घराणा असला, तरी या घराण्याच्या प्रत्यक्ष इतिहास लिखाणाची सुरुवात मात्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून झालेली आहे. देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील या घराण्याचे योगदान अगदीच वाखाणण्याजोगे आहे.
दक्षिण आणि मध्य भारतात जोवर या घराण्याचे विस्तीर्ण साम्राज्य पसरलेले होते, त्या काळात मुस्लिम राजवटींची दक्षिणेकडे डोकावून पाहाण्याची हिम्मत न व्हावी, इतकी जरब या राज घराण्यातील राजकर्तव्याने राजकार्य करणाऱ्या राजांची होती. या घराण्याने आपली ही जरब इसवीसनाच्या तेराव्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत कायम टिकवून ठेवलेली होती. चाळुक्य/साळुंखे यांच्या भारतातील राजवटीच्या या कार्यकाळात, त्यांचे निम्म्याधिक भारतावर साम्राज्य पसरले असावे, यातच या घराण्याचे महत्पण सामावलेले आहे.
दक्षिण आणि मध्य भारतातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यातील तर या घराण्याचे योगदान खूपच वरच्या स्थानावरील आहे. दक्षिण आणि मध्य भारतातील मोठमोठ्या दगडी शिळा एकमेकांवर मांडून, जेवढी काही हेमाडपंती स्वरूपातील मंदिरे उभारलेली आहेत, या सर्व मंदिरांचे निर्माण हे चाळुक्य/साळुंखे कुळातील राजांनी केलेले आहे. अशा पद्धतीने स्वतःच्या स्टाईलने देशात अगणित मंदिरे, लेण्या आणि इतर वास्तुंचे निर्माण करणारा साळुंखे हा इतिहासातील वरच्या क्रमांकावरील एकमेव राज घराणा असावा! या वास्तुंचे निर्माण ही चाळुक्य/साळुंखे घराण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक आणि धार्मिक क्षेत्रातील समृद्धीचीच ही एक खूप मोठी ऐतिहासिक साक्ष म्हणावी लागेल.
देशाच्या इतिहासात घराण्याच्या इतका मोठा इतिहास असलेल्या साळुंखे घराण्यातील आजचा वंशज मात्र पूर्वजांनी निर्माण केलेला हा दैदीप्यमान इतिहास पूर्णपणे विसरून गेला आहे. साळुंखे कुळातील लोकांमध्ये फिरताना ही बाब जाणवल्याने, असे आता खेदानेच म्हणावे लागत आहे. ज्यांच्या पूर्वजांनी म्हणजे चाळुक्य/साळुंखे राजांनी देशात सर्वप्रथम पाटील, देशमुख, इनामदार, जहागीरदार अशा जहागीरीच्या वतनांची निर्मिती करून, ही वतने लोकांना वाटली. चाळुक्य/साळुंखे कुळातील राजांनी त्या काळात ज्या ज्या लोकांना ही वतने वाटली, आज याच वतनाच्या पदव्या आपल्या आडनावासमोर लावलेल्या लोकांनी, कसलीही पदवी आपल्या आडनावासमोर न लावून मिरवणाऱ्या साळुंखे वंशातील लोकांना, आपल्यापेक्षा कमी म्हणावे, ही खरोखरीच आश्चर्याची आणि हसण्याजोगी बाब आहे!

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...