साळुंखे-सोळंके हा इतिहासाच्या पटलावरील एक प्रमुख लढाऊ घराणा
मित्रांनो,
साळुंखे/सोळंके घराण्यातील येणाऱ्या पिढ्या काळाच्या ओघात स्वतःच्या घराण्याचा इतिहास विसरत चालल्या असल्याचे दिसून येत आहे.! साळुंखे-सोळंके हा इतिहासाच्या पटलावरील एक प्रमुख लढाऊ घराणा म्हणून कायम चर्चेत राहिलेला राज घराणा आहे. साळुंखे/सोळंके घराण्यातील पूर्वज असलेल्या बदामीच्या चालुक्य राजांच्या राजवटीच्या काळात तर जवळपास निम्मा भारत चालुक्य राजवटीच्या अधिपत्याखाली होता आणि या विशालकाय राजवटीचे राजे होते साळुंखे घराण्यातील पूर्वज असलेले चालुक्य राजे.!
-
ज्या ज्या राजकुळांनी देशात आणि महाराष्ट्रात धर्मराज्य केली अशा राज कुळामध्ये चालुक्य/सोलंकी म्हणजेच साळुंखे/सोळंके घराण्याचा खूपच वरचा क्रमांक लागतो. साळुंखे/सोळंके कुळातील होऊन गेलेल्या सर्वच राजांनी आपल्या राजकर्तव्याचे माप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतण्याचे काम केले.!
साळुंखे-सोळंके कुळातील पूर्वज राजांनी निर्माण केलेला हा पराक्रमी इतिहासाचा अनमोल ठेवा त्यांच्या वंशजांना भारतीय पाठ्यक्रमातून खूपच त्रोटक प्रमाणात अभ्यासायला मिळत आहे. तसेच पूर्वजांचा पराक्रमी इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता अथवा जिज्ञासू वृत्ती अलीकडच्या काळात लोप पावत चालली असल्याने साळुंखे-सोळंके घराण्यातील पूर्वजांचे पराक्रमी इतिहास त्यांच्या येणार्या पिढ्या विसरत चालल्याचे दिसत आहे.!
-
साळुंखे घराणा हा इतिहासातील एक राजघराणा आणि नंतरच्या काळातील सरदार घराणा, जहागीरदार, सरंजामदार, ईनामदार आणि देशमुख घराणा म्हणून आपली ओळख निर्माण केलेला घराणा आहे. तसेच या घराण्याकडे रणांगणात लढताना पराक्रमातून मिळविलेल्या जवळपास 62 पदव्या आहेत. शिवाय हा घराणा क्षत्रिय मराठ्यांच्या शहाण्णव कुळी यादीतील एक प्रमुख आणि मोठा घराणा आहे.
महाराष्ट्रातील ज्या काही घराण्यातील लोकांनी आपल्या घराण्याची मिळालेली एखादी पदवी आडनावाचे जागी कागदावर लावली आहे, ते लोक आज समाजात अभिमानाने वावरताना दिसत आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे साळुंखे-सोळंके कुळातील लोक इतक्या सगळ्या भूषणावह पदव्या आपल्या घराण्याकडे असून सुद्धा त्या पदव्या आपल्या आडनावा समोर न लावता फक्त साळुंखे-सोळंके आडनावाने वावरत आहेत. त्यामुळे साळुंखे-सोळंके कुळातील आजचे वंशज मात्र पूर्वजांचा दैदीप्यमान इतिहास पूर्णपणे विसरून वरील मोठ मोठ्या पदव्या आडनावापुढे लावायच्या सोडून, दुर्दैवाने ते आज फक्त गावपातळीवरील 'पाटील' ही पदवी लावून मिरवताना दिसत आहेत.!
-
@ ...
चालुक्य- सोलंकी- साळुंखे- सोळंके कुळातील लोकांसाठी
काही आवश्यक माहिती :-
- साळुंखे- सोळंके कुळातील लोकांसाठी मंगल कार्यात उपयुक्त असलेली, काही आवश्यक माहिती....
* कूळ - साळुंखे- सोळंके (चालुक्य)
* गोत्र - चुलकी किंवा चालुक्य
* देवक - साळुंखी पंख
* गुरू - भारद्वाज, मांडव्य, पाराशर
* कुलदेवी - भवानी तुळजापूर
* जुनी कुलदेवी - काली, पावागड-गुजरात (त्या काळातील राजस्थान)
* कुलदेव -
1) खंडेराय - जेजुरी
2) भैरवनाथ - सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद
3) साळुंखेतील काही लोक ज्योतिबा - कोल्हापूर याला सुद्धा आपला कुलदेव मानतात.
* जुना कुलदेव - ब्रह्मनाथ (पुष्करराज राजस्थान)
* वेद - यजुर्वेद
* मंत्र - गायत्री
* वंश - अग्निवंश (अग्नीतून प्रकट झालेले)
* वर्ण - क्षत्रिय मराठा
* ध्वज (झेंडा) - पिवळा (ध्वजस्तंभी हनुमान)
* सिंहासन - पिवळे
* गादी - पिवळी
* वस्त्र - पिवळे
* वारू (घोडा) - पिवळा
?
-अपूर्ण...
-
@
>सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख
(एम.ए.बी.एड्.& बी.पी.एड्.)
-चीफ लाईफ इन्शुरन्स अॅडवायजर LIC*
-आॅल इंडिया चेअरमन क्लब मेंबर
& M.D.R.T. Agent*
@..
''अग्निवंश'',
सिद्धिविनायक काॅलनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बी.
मोबाईल.-
9422241339
9922241339
No comments:
Post a Comment