विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

प्रतिके मराठ्यांच्या श्रीमंतींची : मराठा स्थापत्यकला भाग 1

प्रतिके मराठ्यांच्या श्रीमंतींची : मराठा स्थापत्यकला
भाग 1

 पोस्तसांभार ::


केतन पुरी.
आपल्या तलवारीच्या बळावर स्वराज्यनिर्मिती करताना मराठ्यांनी स्थापत्य,संगीत,नृत्य,वादन,लेखन यांच्यात अभुतपूर्व पराक्रम गाजवला.पुढे 18व्या-19व्या शतकांत सयाजीराव गायकवाड,राजर्षी शाहू महाराज,यशवंतराव होळकर यांसारख्या शासनकर्त्यांनी समाजाला एका उषःकालाकडे नेले.
याचदरम्यान,आपल्या वैयक्तिक वापरासाठी मराठ्यांनी उभारलेल्या काही वास्तू ह्या आजही त्यांच्या श्रीमंतीचा डोलारा मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत.
यातीलच काही महत्वाच्या,अतिसुंदर आणि वैभवशाली उत्तरकालीन स्थापत्याचा आपण मागोवा घेणार आहोत.

1.जय विलास महाल,ग्वाल्हेर.

उत्तरेतील काही प्रमुख मराठा सरदारांपैकी एक प्रमुख घराणे म्हणजे शिंदे घराणे होय.राणोजी शिंदे,दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे,महादजी शिंदे यांसारखे नररत्न देणारे घराणे.याच घराण्यात जन्म घेतलेल्या महाराज जयाजीराव शिंदे यांनी 1874 मधे ग्वाल्हेर येथे एक मोठा महाल बांधला,'जय विलास महाल'..!!

मराठा स्थापत्यशैली आणि इटलीच्या स्थापत्यशैलीचा सुरेख संगम या महालाच्या बांधनीत आपल्याला दिसून येतो.400 खोल्यांची बांधनी असणारा हा महाल सध्या सर्व पर्यटकांसाठी खुला आहे.यातील 40 खोल्यांत असणारे 'जयाजीराव शिंदे संग्रहालय' हे पाहन्यासारखे..
या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील दरबार हॉल.इटली,इंग्लंड,न्यूयॉर्क,इजिप्त,जापान,चीन यांसारख्या देशातून आणलेल्या फर्नीचरने हा महाल नटला आहे.
दरबार हॉल च्या छतावर 2 बेल्जियम पद्धतीचे अतिसुंदर असे झुंबर लटकावले आहेत.अभ्यासकांच्या मते,जगात असणाऱ्या सर्वात महागड्या झुंबरांपैकी ही 2 झुंबर आहेत..!!यातील एकाचे वजन 7 टन एवढे भरेल,इतकी मोठी आहेत.
आजच्या काळाचा विचार केला,तर 1200 कोटी इतका खर्च या इमारतीच्या बांधकामाला आला.

मराठ्यांचा हा वैभवशाली वारसा एकदातरी पाहावाच इतका उत्कृष्ट आहे.

कमी

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...